Maldives to Hold Road Shows in India: अखेर मालदीवने घेतले झुकते माप; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतामध्ये करणार रोडशोज- Reports

या संकटाचा सामना करण्यासाठी मालदीव आता पुन्हा भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यात व्यस्त आहे.

Maldives (Photo Credits: Wikimedia Commons) .. Read more at: https://www.latestly.com/lifestyle/travel/national-tourism-day-2022-from-the-maldives-to-los-angeles-places-that-should-be-in-your-bucket-list-3677192.html

Maldives to Hold Road Shows in India: भारत आणि मालदीवमधील (Maldives) वादानंतर मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या अक्षरशः नगण्य झाली आहे. यामुळे मालदीवचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीयांचा मोठा वाटा होता. मात्र भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला आहे. आता मालदीवने भारतासमोर झुकते माप घेतले आहे. मालदीव पुन्हा भारतीय पर्यटकांना आमंत्रित करण्यासाठी भारताची मदत घेत आहे. मालदीवच्या एका प्रमुख पर्यटन संस्थेने भारतीय शहरांमध्ये रोड शो आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

भारतीय पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत असताना मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्स (MATATO) अनेक समस्यांना तोंड देत आहे. आता ही संघटना दोन्ही देशांमधील प्रवास आणि पर्यटन सहकार्य वाढवण्यासाठी भारतीय उच्चायुक्त मुनू महावर यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचली आहे.

याआधी 6 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवरून एक ट्विट केले होते. ज्यामध्ये पीएम मोदींनी लक्षद्वीप बेटाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यानंतर मालदीवच्या तीन अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह कमेंट केल्या. त्यानंतर भारतात मालदीवला विरोध सुरू झाला. या वादामुळे अनेक सेलिब्रिटींसह शेकडो भारतीयांनी मालदीवचा दौरा रद्द केला होता.

आकडेवारी सांगते की पूर्वी येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या पहिल्या क्रमांकावर होती, आता ती सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मालदीव आता पुन्हा भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यात व्यस्त आहे. भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत आणण्याच्या प्रयत्नात, मालदीवमधील एक प्रमुख पर्यटन संस्था अनेक प्रमुख भारतीय शहरांमध्ये रोड शो आयोजित करण्याची योजना आखत आहे. (हेही वाचा: Iran To Abolish Visa for Indian Citizens: भारतीय पर्यटकांना दिलासा! इराणमध्ये मिळणार व्हिसाशिवाय प्रवेश, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, चीन समर्थक नेता समजले जाणारे मोहम्मद मुइझू यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले होते की, ते देशातून भारतीय सैन्य काढून टाकण्याचे त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करतील. मुइज्जू यांच्या या घोषणेनंतर भारत आणि मालदीवमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif