Kumbh Mela 2019 : प्रयागराज कुंभमेळ्यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये दिली खास सवलत !

महाकुंभ मेळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही 3 ऐवजी 15 दिवस आधी तुमचं अनारक्षित तिकीट (UnreservTickts) बुक करू शकणार आहात.

Railway Station (Representational Image/ Photo Credit: PTI)

Kumbh Mela 2019 : यंदा महाकुंभ मेळा इलाहाबाद (प्रयागराज) मध्ये आयोजित करण्यात आला आहे. 15 जानेवारी ते 2 मार्च 2019 या काळात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी (Kumbh Mela) रेल्वे प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. प्रयागराजला (Prayagraj Station)  जाण्यासाठी अनारक्षित तिकिटांच्या नियमांमध्ये रेल्वेने शिथिलता आणली आहे. महाकुंभ मेळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही 3 ऐवजी 15 दिवस आधी तुमचं अनारक्षित तिकीट (UnreservTickts) बुक करू शकणार आहात.

महाकुंभ मेळ्याच्या (Kumbh Mela)  दिवसांमध्ये देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. अशावेळेस रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इलाहाबाद(Prayagraj Station) क्षेत्रातील 12 स्टेशनवर हा तिकिटाचा नियम लागू होणार आहे. UTS APP द्वारा कोणत्याही भारतीय रेल्वे स्थानकावरून अनारक्षित तिकीट बुक केलेले असल्यास प्रवासाचा दिवस वगळता रिटर्न तिकीट १५ दिवस आधी बुक करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

इलाहाबाद जंक्शन, इलाहाबाद सिटी, नैनी, सुबदेरगंज, रामबाग, प्रयाग घाट, दारागंज, फाफामऊ, झूसी, विंध्याचल, छेओकी यास्थानकासाठी रेल्वे प्रशासनाने सूट दिली आहे. मात्र एकदा बूक केलेलं तिकीट रद्द करण्याची सोय नाही. त्यामुळे प्रवाशांची कुंभमेळ्याचं प्लॅनिंग करूनच तिकीट बुक करण्याचं आवाहन रेल्वेने केले आहे.