Family Holiday Spot: अमेरिकेच्या Statue of Liberty पेक्षा गुजरातमधील Statue of Unity ला पर्यटकांची जास्त पसंती; जाणून घ्या कारण
गुजरात (Gujarat) हे कदाचित भारतातील एकमेव राज्य असेल जे पर्यटनासाठी सर्वात वैविध्यपूर्ण राज्य मानले जाते. गुजरातमधील बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत, पण केवडियामधील (Kevadia) 597 फिट उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (Statue of Unity) ने लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
गुजरात (Gujarat) हे कदाचित भारतातील एकमेव राज्य असेल जे पर्यटनासाठी सर्वात वैविध्यपूर्ण राज्य मानले जाते. गुजरातमधील बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत, पण केवडियामधील (Kevadia) 597 फिट उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (Statue of Unity) ने लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. महत्वाचे म्हणजे अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा (Statue of Liberty) स्टॅच्यू ऑफ युनिटी अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे. या ठिकाणी असलेल्या चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क, आरोग्य व्हॅन, कॅम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंगसारख्या गोष्टींमुळे हे ठिकाणी कुटुंबासाठी सुट्टीचे एक महत्वाचे केंद्र (Family Holiday Spot) बनत चालले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
हे ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘भेट दिलीच पाहिजे’ असे ठिकाण म्हणून नमूद केले आहे. या ठिकाणाजवळ नर्मदा नदीच्या काठी आजूबाजूला सातपुरा आणि विंध्याचल पर्वतरांगांच्या आसपास अनेक ठिकाणे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता म्हणाले की, सुरवातीपासूनच संपूर्ण कुटुंबासाठी हे ठिकाण एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची पंतप्रधानांची दृष्टी होती. पंतप्रधान मोदींनी बनवलेले शहरातील मुख्य आकर्षण म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जे अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा अधिक पर्यटकांना आकर्षित करते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याआधी आणि लॉकडाउनपूर्वी दररोज 13,000 पर्यटक स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देत असत. मागील महिन्यात प्रशासनाने याबाबत थोडी शिथिलता दिल्यानंतर सुमारे 10 हजार लोक या विशेष पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. राजीव गुप्ता यांनी सांगितले की, इथे शहरातील सुमारे 3,000 आदिवासी मुला-मुलींनी थेट रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. याशिवाय 10,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. (हेही वाचा: जगातील सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीमध्ये राजधानी दिल्लीला मिळाले 62 वे स्थान; लंडन ठरले अव्वल, Check Full List
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या खाली नर्मदा नदीत सुविधांनी सुसज्ज क्रूझ चालविला जातो. 375 एकर डोंगराळ व वनक्षेत्रात जंगल सफारी पसरलेली आहे. या ठिकाणी शेकडो प्राणी-पक्षी राहतात. तसेच आफ्रिकेतील सर्व प्राण्यांना येथे ठेवण्यात आले आहे. इथे 600 मीटर लांबीच्या ट्रॅकवर धावणारी न्यूट्री ट्रेन पाच थीमवर आधारित स्टेशनवर थांबते. फाइव्ह डी व्हर्च्युअल रिअॅलिटी थिएटर मुलांना खाण्यापिण्याशी संबंधित माहिती देऊन व्यस्त ठेवते. या सर्व कारणांमुळे स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)