Mumbai Airport BEST Bus Services: मुंबई विमानतळ बससेवेसाठी 'बेस्ट'ने सुरु केली 'आसन आरक्षण' सेवा
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) जाण्यासाठी किंवा विमानतळावर उतरल्यावर शहरात येण्यासाठी 'बेस्ट'ने (BEST) एक बेस्ट सेवा सुरु केली आहे. होय, मुंबईत उतरण्यापूर्वी किंवा विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही आता शहरातील बेस्ट विमानतळ सेवा बसमध्ये जागा आरक्षित (Mumbai Airport BEST Bus Services) करू शकता.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) जाण्यासाठी किंवा विमानतळावर उतरल्यावर शहरात येण्यासाठी 'बेस्ट'ने (BEST) एक बेस्ट सेवा सुरु केली आहे. होय, मुंबईत उतरण्यापूर्वी किंवा विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही आता शहरातील बेस्ट विमानतळ सेवा बसमध्ये जागा आरक्षित (Mumbai Airport BEST Bus Services) करू शकता. बेस्टच्या 'आसन आरक्षण' (BEST Seat Reservation) सेवेमुळे अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे. एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, BEST मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (T2) शहराच्या विविध भागांमध्ये रात्रभर विमानतळ बसेस चालवते. ज्या प्रवाशांना मुंबई विमानतळावरून शहराच्या विविध भागात जायचे आहे ते बेस्टने सुरू केलेल्या विमानतळ बससेवेवर आपली जागा आरक्षित करू शकतात. 9 सप्टेंबरपासून मुंबई विमानतळावरून प्रवास करण्यासाठी आपली जागा आरक्षित करण्यासाठी BEST च्या चलो अॅपचा (BEST’s Chalo app) वापर करता येऊ शकतो.
बेस्टचे आसन कसे आरक्षित कराल?
- BEST Chalo अॅप डाउनलोड करा आणि मार्ग 881, 882 किंवा 884 शोधा.
- ‘रिझर्व्ह’ पर्यायावर टॅप करा.
- पिकअप आणि ड्रॉप पॉइंट निवडा
- टाइम स्लॉट निवडा आणि ऑनलाइन पेमेंट करा
- त्यानंतर तुम्ही बसचा थेट मागोवा (ट्रॅक ठेवणे) घेऊ शकता आणि बोर्डिंग झाल्यावर, तुमचे बुकिंग प्रमाणित करण्यासाठी कंडक्टरच्या मशीनवर तुमचा फोन टॅप करा. (हेही वाचा, Panvel-Chiplun DEMU Special: गणेशोत्सव 2022 मुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल-चिपळूण डेमू विशेष सेवा)
बेस्ट बस सेवेचे सध्याचे मार्ग:
- मार्ग 881: CSIA टर्मिनल 2 - बॅकबे बस डेपो
- मार्ग 882: CSIA टर्मिनल 2 - जलवायू विहार, खारघर
- मार्ग 884: CSIA टर्मिनल 1A - कॅडबरी जंक्शन, ठाणे
ट्विट
बेस्ट काही मार्गांवर या सेवा चालवत आहे. या बसेस टर्मिनल 2 किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शहराच्या विविध भागांमध्ये धावतील. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाचा प्रवाशांना फायदा होईल. कारणआम्ही आरामदायी वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमध्ये बसण्याची हमी देते. कॅब किंवा स्वयं-चालित (स्वता कार चालवणे) कारच्या तुलनेत या बसेस एक सोयीस्कर आणि अधिक किफायतशीर पर्याय देतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)