रोमान्स आणि रोमांच यांचा एकत्र अनुभव देणारी भारतातील बेटं, एकदा जरुर भेट द्या
ज्या ठिकाणी आयुष्यात तुम्ही एकदा तरी गेलंच पाहिजे. तुम्ही जर सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचा विचार करत असाल किंवा हनिमून साजरा करण्यासाठी ठिकाणं शोधत असाल तर, ही बेटं कादाचित तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो.
Best Beach Islands in India for Honeymoon Vacation: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. हे केवळ जात, धर्म आणि पोषाखाबाबतीतच खरे नाव्हे. तर, निसर्गाच्या बाबतीतही हे तंतोतंत खरे आहे. भारतात असे काही नैसर्गिक खजिने आहेत जे पाहून डोळ्याचे पारणे फिटते. मग त्या पर्वतरांगा असो, दऱ्या-डोंगर, नद्या असो किंवा विविधतेने नटलेला समुद्र आणि त्यातील बेटं असो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बेटांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी आयुष्यात तुम्ही एकदा तरी गेलंच पाहिजे. तुम्ही जर सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचा विचार करत असाल किंवा हनिमून साजरा करण्यासाठी ठिकाणं शोधत असाल तर, ही बेटं कादाचित तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो.
लक्षद्विप (Lakshadweep)
भारताच्या दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात असलेला हा एक बेटांचा समूह आहे. करवत्ती ही या बेटांची राजधानी आहे. केंद्र शासित प्रदेशांपैकी असलेला हा सर्वात छोटा भूपृष्ठभाग आहे. लक्षवधी वर्षांपूर्वी जमीनीतून निघालेल्या लाव्हारसातून या बेटाची निर्मिती झाली. लक्षद्विप समूहात एकूण 36 बेटं आहेत. परंतू, त्यातील एकूण 7 बेटांवरच जनजीवन पाहालया मिळते. त्यातही केवळ 6 बेटांवर जायलाच पर्यटकांना अनुमती आहे. तर विदेशी पर्यटकांना 2 बेटांवर जायला परवानगी आहे. निसर्गाचा अद्भुत अविष्कार पाहण्यासाठी लोक जगभरातून येथे येतात. ऑक्टोबर ते मे या काळात तुम्ही येथे भेट देऊ शकता.
माजूली (Majuli Island)
सर्वाधिक नद्या असलेलं बेट म्हणून माजूली बेटाला ओळखले जाते. असमज राज्यातील हे बेट सूर्यास्त आणि सुर्योदयासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या बेटाला भेट देऊ शकता. विशेष म्हणजे या बेटावर तुम्ही बाईकनेही फिरु शकता. (हेही वाचा, 5 वर्षांत 80 देशांतील 250 शहरांचा दौरा; पर्यटनासाठी विकले घरदार)
दीव बेट (Diu Island)
केवळ समुद्रच नव्हे तर आणखी बरेच काही अशी या बेटाची थोडक्यात ओळख करुन देता येईल. भारतामधली पोर्तुगाल संस्कृती तुम्हाला पाहायची किंवा अनुभवायची असेल तर तुम्ही दीव बेटाला नक्की भेट द्या. आज येथे प्रामुख्याने गुजाराती संस्कृतीचा प्रभाव पाहायला मिळतो. या ठिकाणी तुम्ही ऑक्टोबर ते जानेवारी या काळात भेट देऊ शकता. इथला किल्ला, म्यूजियम, मंदिर आणि चर्च पाहण्यासारखे आहे.
सेंट मेरी आईसलॅंड (St Mary's Island)
कर्नाटक येथील हा एक छोट्या बेटांचा समूह आहे. मेपल येथून नावेद्वारे तुम्ही केवळ 15 मिनिटांत येथे पोहोचू शकता. इथले जगप्रसिद्ध कोकोनट गार्ड पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात.
अंदमान निकोबार बेट (Andaman and Nicobar Islands)
हनिमूनसाठी अत्यंत योग्य असे हे ठिकाण. गर्दी, कोलाहाल यांपासून प्रचंड दूर. अगदी शांत. इथला समुद्र आणि समुद्र किनारा तुम्ही नक्कीच एन्जॉय करु शकता. हनिमून कपलचं हे एक आवडतं ठिकाण आहे.