Battle of Sinhagad: सिंहगड महापराक्रम शौर्यदिनाला 350 वर्ष पूर्ण; तानाजी मालुसरे यांनी कसा जिंकला कोंढाणा किल्ला, सविस्तर माहिती घ्या जाणून

350th anniversary of 'Battle of Sinhagad': सिंहगड (Sinhagad) महापराक्रम शौर्यदिनाला आज 350 वर्ष पूर्ण झाली असून या लढाईत मराठ्यांनी विजय मिळवला होता. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्र आणि मराठा स्वराज्याचे मावळे तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन कोंढणा (kondhana) किल्ला काबीज केला होता.

Tanaji Malusare (Photo Credit: Twitter)

350th anniversary of 'Battle of Sinhagad': सिंहगड (Sinhagad) महापराक्रम शौर्यदिनाला आज 350 वर्ष पूर्ण झाली असून या लढाईत मराठ्यांनी विजय मिळवला होता. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्र आणि मराठा स्वराज्याचे मावळे तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन कोंढणा (kondhana) किल्ला काबीज केला होता. भारताच्या इतिहासात बऱ्याच लढाई झाल्या आहेत, ज्यात अनेक योद्धांनी निर्भयपणे लढल्या आणि जिंकल्या आहेत. एवढेच नव्हेतर अशा परिस्थितीत अनेक योद्ध्यांनी आपला जीव गमावला आहे. तानाजी मालुसरे त्यापैंकी एक योद्धा आहेत. तानाजी मालुसरे यांनी 1970 मध्ये मुगल किल्ल्यांचे रक्षणकर्ते उदयभान राठोड यांच्याविरूद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला होता.

तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि सामर्थ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सिंह म्हणायचे. तानाजी मालुसरे यांचा जन्म इ.स.पू. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याच्या गोदाली गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार कोलाजी आणि त्याच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. तानाजी मालुसरे यांनी मराठा स्वराज्यासाठी अनेक युद्ध केली. मात्र, सिंहगडासाठी दिलेला लढा न विसारता येणारा आहे. आज या लढाईला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, ही लढाई तानाजी मालुसरे यांनी कशी जिंकली होती, याची अजूनही अनेकांना योग्य माहिती नाही. नुकताच तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे काही इतिहास अनेकांना समजला आहे. हे देखील वाचा- Martyrs’ Day 2020 Images: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या राष्ट्रपितांना आदरांजली

सिंहगडाला पूर्वी कोंढणा किल्ला या नावाने ओळखले जात होते. शिवाजी महाराज यांना 1965 मध्ये पुरंदरच्या करारात कोंढाणा किल्ला मुगलांना द्यावा लागला होता. या करारानंतर राजपूत, अरबी आणि पठाण सैन्य मोगलांच्या वतीने कोंढाणा किल्ल्याची सुरक्षा करीत असे. यात सर्वात सक्षम सेनापती उदयभान राठौर आणि दुर्गापाल होते, यांची निवड मुघल सेना प्रमुख जयसिंग प्रथम यांनी केली होती. कोंढणा हा पुण्याजवळील सर्वात मजबूत तटबंदी आणि डावपेचात्मक किल्ला होता. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला परत मिळवायचा होता. दरम्यान,तानाजी मालुसरे यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू होती. यामुळे तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना कळाले की, शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला परत मिळवायचा आहे. त्यानंतर आपल्या मुलाचे लग्न बाजुला सावरून त्यांनी कोढणा काबीज करण्यासाठी हातात तलवार घेतली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आदेश मिळाल्यानंतर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकण्यासाठी झेंडा हाती घेतला. एकीकडे उदयभानकडे 5000 मुघल सैनिक होते तर, दुसरीकडे तानाजी मालुसरे यांच्याकडे केवळ 300 सैन्य होते. यामुळे तानाजी मालुसरे यांच्यासमोर उदयभानचे मोठे आव्हान होते. एवढेच नव्हे कोंढाणा किल्ल्याच्या भिंती जितक्या उंच होत्या, चढायला तितक्याच कठीण होत्या. असे म्हटले जाते की, तानाजी मालुसरे यांनी घोरपडीच्या साहाय्याने कोंढणा किल्ल्याची विशाल भिंत चढून मुघल सैनिकांवर हल्ला केला होता. त्यानंतर मुघलांशी झुंज देत मराठ्यांनी कोंढणा किल्ल्यावर विजय मिळवला होता. परंतु, या युद्धात तानाजी मालुसरे यांना वीरगति प्राप्त झाली होती.

कोढाणा किल्ल्यावर विजय मिळवून देखील छत्रपती शिवाजी महाराज नाराज झाले होते. आपला सक्षम सेनापती आणि मित्र गमावल्याने ते अस्वस्थ झाले होते. त्यावेळी गड आला, पण सिंह गेला असे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडातून बाहेर पडली. त्यावेळी त्यांनी कोंढणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड केले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now