Tips To Take Care of Pets In Summer: पाळीव प्राण्यांची उन्हाळ्यात घ्या अशी काळजी, जाणून घ्या टीप्स
प्राण्यांना ही उष्णतेचा सामना करावा लागतो. वाढत्या उष्णतेमुळे पाळीव प्राण्याच्या वर्तनात बदल होत असतो.
Tips To Take Care of Pets In Summer: दिवसेंदिवस उष्णतेचा लाट पसरत चालली आहे. प्राण्यांना ही उष्णतेचा सामना करावा लागतो. वाढत्या उष्णतेमुळे पाळीव प्राण्याच्या वर्तनात बदल होत असतो. कुत्रे, मांजर आणि इतर पाळीव प्राण्यांना मार्च, एप्रिल, मे महिन्यात अस्वस्थत वाटू लागते. हा काळ पाळीव प्राण्यांसाठी कठीण होऊ शकतो. या कालावधीत आपल्या प्राण्यांची खास काळजी घेतली पाहिजे. पाळीव प्राण्यांना या दिवसांत उष्माघाताचा सामना करावा लागतो. उष्माघातावर उपचार न केल्याच ते प्राण घातक ठरू शकते. जेणे करून उन्हाळ्यात फ्रेश वाटेल. घरच्या घरी काही सोप्या टीप्स फोलो करा आणि उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करा. (हेही वाचा- धक्कादायक! 32% मुंबईकर करत आहेत झोपेशी संबंधीत आजारांचा सामना)
- पाणी- या दिवसांत भरपूर पाणी पिणं खुप फायदेशीर ठरते. त्यामुळे त्यांच्या शरिरात थंडावा निर्माण करण्यासाठी मदत करते. पाण्याने शरिर हायड्रेत राहण्यास मदत करते.
- कलिंगड आणि काकडी- आपल्या पाळीव प्राण्यांना फळ द्या. कलिंगड आणि काकडी त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
- कुलिंग मॅट- अॅमेझॉनवर पाळीव प्राण्यांसाठी कुलिंग मॅट उपलब्ध आहेत. ज्यामुळे आपल्या प्राण्यांना कुलिंग ठेवण्याचे काम करते. सतत एसी चालू ठेवणे हे शक्य होत नसल्याच हा पर्याय योग्य आहे. .
- पौष्टीक पदार्थ - या दिवसांत त्यांना पौष्टिक पदार्थ खाण्यास द्यावे. जेणे करून शरिरात ताकद टिकून राहिल आणि आरोग्य सुधारेल.
- बाहेर जाण्यास टाळावे- उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्यांना बाहेर जाण्यास टाळावे. जेणे करून त्यांना थकवा येणार नाही आणि उन्हाचे चटके देखील लागणार नाही.
- डॉक्टरांचा सल्ला- जर या दिवसांत आपल्या पाळीव प्राणांना जास्त थकवा येत असेल कींवा लाळ गळत असेल तर यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.