अंतर्वस्त्रे निवडताना घ्या अशी काळजी, नाहीतर 'प्रायव्हेट पार्टस'वर होईल हा परिणाम
प्रायव्हेट पार्ट हे शरीराचे अत्यंत संवेदनशील पार्टस असतात, त्यामुळे त्यांची व्यवस्थित काळजी घेणे फार महत्वाचे असते. यासाठी अंतर्वस्त्रे निवडताना काही गोष्टी घ्यानात ठेवायला हव्या
अंतर्वस्त्र (Undergarments), स्त्रिया आणि पुरुष दोहोंसाठी अत्यंत खासगी पण एक महत्वाची गोष्ट. काही वर्षांपूर्वीपर्यंत या गोष्टीची वाच्चताही कोठे होत नसे, मात्र आता कपड्यांच्या याही प्रकारावर मोकळेपणाने बोलले जात आहे. तुम्हाला माहित आहे? आपल्या शरीराची ठेवण, आपला मूड, आपले मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी अंतर्वस्त्रे फार मोठी भूमिका बजावतात. होय, अंतर्वस्त्रे जितकी कम्फर्टेबल तितके जास्त तुम्ही आत्मविश्वासाने काम करू शकता. प्रायव्हेट पार्ट हे शरीराचे अत्यंत संवेदनशील पार्टस असतात, त्यामुळे त्यांची व्यवस्थित काळजी घेणे फार महत्वाचे असते. यासाठी अंतर्वस्त्रे निवडताना काही गोष्टी घ्यानात ठेवायला हव्या. कपड्यांच्या आत असलेल्या इनर्ससाठी कशाला जास्त पैसे घालवायचे, ते तर बाहेरून दिसतही नाहीत असा बऱ्याच लोकांचा समाज असतो, मात्र हे चुकीचे आहे.
> प्रायव्हेट पार्टसचा आकार, त्यांना मिळणारा आराम आदी गोष्टी अंतर्वस्त्र खरेदी करताना जरूर पाहाव्यात. यामध्ये कापडाचा दर्जा हा खूप महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे त्यात तडजोड करू नका.
> दिवसातील कमीतकमी 16 तास अंतर्वस्त्रे शरीरावर असतात, त्यात ती घट्ट असतात त्यामुळे आरामदायी अंतर्वस्त्रे निवडा. ब्रा ट्राय करताना तुमचे दोन्ही हात वर आणि खाली दोन्ही दिशेने फिरावा. असे केल्याने तुम्ही घातलेला ब्रा तुमच्यासाठी योग्य आहे की, नाही हे तुमच्या लक्षात येईल.
> ब्रा निवडताना त्या जास्त घट्ट आणि सैल असता कामा नयेत. स्तनांचा आकार त्यांच्या कप्समध्ये व्यवस्थित कव्हर झाला पाहिजे याकडे लक्ष द्या. लक्षात घ्या, तुम्ही निवडलेल्या ब्रावर स्तनांचा आकार भविष्यात कसा राहील, हे अवलंबून असते त्यामुळे ब्रा खरेदी करताना ट्रायल रूममध्ये तो ब्रा किमान 2-3 मिनिटे परिधान करून ठेवा. त्या मिनीटात जर तुम्हाला कम्फर्टेब वाटले तरच तो खरेदी करा.
> तुम्ही जर व्यायाम करत असाल तर धावताना अथवा व्यायाम करताना स्तनांचे स्तायू दुखावले जातात, त्यामुळे ज्या ब्रामधून स्तनांची जास्त हालचाल होणार नाही असेच ब्रा निवडा.
> अंतर्वस्त्रांचे कापड तुमच्या त्वचेशी सांगड घालणारे असावे. अंतर्वस्त्रे घट्ट असल्याने शक्यतो आपल्या त्वचेला कोणते कापड सूट होईल हे पाहून ते निवडा.
> पँटी निवडताना ती जास्त घट्ट नसावी याकडे लक्ष द्या. पँटी आणि प्रायव्हेट पार्टमध्ये जास्त घर्षण होऊ नये हा यामागील उद्देश.
> काहीवेळा तुम्ही घातली पँटी तुमच्या जीन्समधून बाहेर दिसते, हे टाळण्यासाठी पँटीच्या आकाराकडे लक्ष द्या. (हेही वाचा: सेक्समध्ये पार्टनरला आनंद देण्यासाठी काही टिप्स; कारण ‘या’ अपेक्षा मुली कधीच बोलून दाखवत नाहीत)
> अंतर्वस्त्रे खरेदी करताना चांगल्या क्वालिटीची खरेदी करा, नाहीतर खाज, खरुज, आणि इतर त्वचेशी संबंधित रोग उद्भवू शकतात.
लक्षात ठेवा, बाहेरून अथवा ऑफीसमधून घरी परत आल्यावर ताबडतोब आपली अंतर्वस्त्रे काढून ठेवा. अंतर्वस्त्रे वेळोवेळी गरम पाण्याने धुवा आणि दररोज नवीन अंतर्वस्त्रेच परिधान करा. रात्री शक्यतो निर्वस्त्र झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान संतुलित राहते, तसेच चुटकीसरशी व्यक्तीचा थकवा दूर होऊन त्याला आरामदायक झोप लागते.