Diwali 2018 : धनत्रयोदशीला या गोष्टींचे केलेले दान; बनवेल तुम्हाला धनवान
थोडक्यात या दिवशी केलेल्या दानामुळे तुम्हाला नंतर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
दिवाळीच्या आधी धनत्रयोदशीचा उत्सव सर्वत्र धुमधडाक्यात साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. यातही सोने, चांदी आणि भांडी यांना विशेष प्राधान्य दिले जाते. या दिवशी विशेषत: चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. कारण चांदी चंद्राचं प्रतिक आहे. चंद्र धनाचा स्वामी आणि संतुष्टता, शीतलतेचं प्रतीक आहे. पुराणात सांगितले आहे की, धनत्रयोदशीला फक्त गोष्टी विकत घेण्यानेच नाही तर, दान करण्याचेही विशेष महत्व असते. असे सांगितले जाते की, या दिवशी केलेले दान नंतर आपणालाच अनेक पटींनी पुन्हा प्राप्त होते. थोडक्यात या दिवशी केलेल्या दानामुळे तुम्हाला नंतर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया धनत्रयोदशीला कोणत्या गोष्टींचे दान हे शुभ मानले आहे. (हेही वाचा : Diwali 2018 : दिवाळीची सफाई करताना काढून टाका घरातून या गोष्टी नाहीतर निर्माण होईल वास्तुदोष)
> अन्नाचे दान – असे म्हणतात की, आपणास जर आरोग्याच्या समस्या असतील तर गहू, तांदूळ यांचे दान करणे हे शुभ असते. याचसोबत पाण्याचेही दान शुभ मानले आहे. मात्र हे दान करताना ज्या व्यक्तीला त्याची गरज अशाच व्यक्तीला ते करण्याची खबरदारी घ्या.
> पिवळ्या वस्त्राचे दान – धनत्रयोदशीला वस्त्राचे दान महादान मानले गेले आहे. त्यामुळे या दिवशी गरजवंताला केलेले पिवळ्या वस्त्राचे दान तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकते.
> नारळ आणि गोड पदार्थांचे दान – पैशांची चणचण असल्याच, आर्थिक समस्या असल्यास, धनत्रयोदशीला नारळ आणि गोड पदार्थांचे दान करावे. यामुळे पैशांची तंगी राहत नाही. तसेच यादिवशी घराघरात झाडूची देखील पूजा केली जाते, त्यामुळे दान म्हणून तुम्ही झाडू देखील देऊ शकता.
> लोह्याचे दान – धनत्रयोदशीला कोणत्याही धातूचे दान हे शुभ मानले आहे. त्यातल्या त्यात लोह्याचे दान फार महत्वाचे आहे. लोह्याच्या दानामुळे घरातील दुर्भाग्य नष्ट होते आणि लक्ष्मीची सदैव कृपा राहते.
> सौभाग्याची लक्षणे – ज्या मुलींचे लग्न ठरत नाही त्यांनी धनत्रयोदशीला सौभाग्याची लक्षणे दान म्हणून द्यावीत.