Mansoon Pet Care: मानसूनमध्ये पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी, आजारांना ठेवा दूर

त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे आपल्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर परिणार होऊ शकतो.

pet care in mansoon pC INSTA

Mansoon Pet Care: पावसाळा (Mansoon) म्हटलं की, आजारांना निमंत्रण. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे आपल्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर परिणार होऊ शकतो. त्यामुळे या दिवसांत पाळीव प्राण्यांची काळजी (Pet Care) घेणे महत्त्वाचे ठरते. बाहेर घेऊन जाताना पाळीव प्राण्यांच्या रेनकोटचा वापर करा. पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही महत्त्वाचे टीप्स जाणून घ्या, (हेही वाचा- बंगालमध्ये बर्ड फ्लूचा एकही रुग्ण नाही, परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी टीम गठीत)

1. स्वच्छता-

कुत्र्यांना दररोज फिरण्यासाठी बाहेरच्या परिसरात घेऊन जात असतो. पावसाळ्यात माती आणि पाण्यामुळे कुत्र्यांचे पाय आणि शरीर ओले होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे पाय नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे.   पाय आणि शरिर पुसण्यासाठी त्यांना कोरड्या किंवा गरम पाण्याच्या कपड्याने पुसा. शक्य झाल्यास त्यांना पावसाळ्यात रेनकोट वापरा.

2. सुरक्षितता-

पावसाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे प्राण्यांना उबदार जागा जास्त पसंद येते त्यामुळे प्राण्यांना शक्य झाल्यास उघड्यावर ठेवणे टाळा. त्यांच्यासाठी आरामदायक आश्रयाची व्यवस्था करा. थंडीपासून त्यांचा बचाव करा.

3. त्वचेची काळजी-

पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या वाढतात. प्राण्यांच्या केस गळतीचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यांच्या त्वचेची काळजी घ्या. फंगस आणि बॅक्टेरिया वाढू नये यासाठी त्यांना आवश्यकतेनुसार अंघोळ घाला. पावसाच्या पाण्यात खेळू देऊ नका.

4. आहाराची काळजी -

मान्सूनमध्ये त्यांच्या आहारात योग्य बदल करा. ताजे आणि पौष्टिक अन्न द्या. जेणे करून शरिरात ऊब निर्माण होईल. जेवणाची आणि पाण्याची भांडे नेहमी स्वच्छ ठेवा आणि त्यात ताजे पाणी भरा.

5. व्यायाम किंवा खेळ

पावसाळ्यात बाहेर फिरणे आणि किंवा खेळणे कठीण होते त्यामुळे त्यांना घरात खेळणी आणून घ्या. त्यांच्या शरिरारला आवश्यक व्यायाम घरात करायला लावा.

6. आरोग्य तपासणी-

पावसाळ्यात संसर्ग रोग पसरण्याची शक्यता वाढते त्यामुळे प्राण्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्यांची काळजी घ्या. योग्य वेळीस पाळीव प्राण्यांचे लसीकरण करून घ्या.