Femina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)

या सौंदर्यस्पर्धेत भारताला यावर्षीची मिस इंडिया मिळाली आहे. राजस्थानच्या सुमन राव (Suman Rao) ने या सौंदर्यस्पर्धेत फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आहे.

Femina Miss India 2019 - सुमन राव (Photo Credit : Twitter)

काल, 15 जून रोजी मोठ्या दिमाखात फेमिना मिस इंडिया 2019 (Femina Miss India 2019) चा सोहळा पार पडला. या सौंदर्यस्पर्धेत भारताला यावर्षीची मिस इंडिया मिळाली आहे. राजस्थानच्या सुमन राव (Suman Rao) ने या सौंदर्यस्पर्धेत  फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आहे. मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इंडोर स्टेडियममध्ये रात्री 8 वाजल्यापासून या दिमाखदार सोहळ्याला सुरुवात झाली होती. या स्पर्धेत पहिली रनरअप ठरली आहे उत्तर प्रदेशची  शिनता चौहान. तर तेलंगानाची संजना विज दुसरी रनरअप ठरली आहे.

या कार्यक्रमासाठी अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. चित्रपट निर्माते करण जौहर, अभिनेता मनीष पॉल आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा, अभिनेत्री दिया मिर्जा आणि नेहा धूपीया हे या स्पर्धेचे जज होते. या वर्षी 7 डिसेंबर रोजी थायलंड (Thailand) येथे होणाऱ्या मिस वर्ल्ड 2019 (Miss World 2019) साठी सुमन राव भारताचे प्रतिनिधित्व करेल.

फेमिना मिस इंडिया 2019 फिनाले ची टॉप 6 फाइनलिस्ट- यूपीची शिनता चौहान, धत्तीसगढ़ची शिवानी जाधव, असमची ज्योतिश्मिता बरुआ, बिहारची श्रेया शंकर, तेलंगानाची संजना विज आणि राजस्थानची सुमन राव होती. याआधी सुमन रावने Miss Uttar Pradesh 2019 चाही किताब जिंकला आहे. या स्पर्धेमध्ये 30 राज्यातील सौंदर्यवतींनी भाग घेतला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif