व्हिडिओ : सचिन तेंडूलकरने असे केले बाप्पाचे विसर्जन
या बदलाची सुरुवात त्याने स्वतःपासून केली आहे.
महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशभरात गणपती उत्सवाची धूम आहे. देशातील अगदी सामान्य जनतेपासून ते सेलिब्रेटीजपर्यंत सर्व बाप्पाच्या भक्ती दंग आहेत. हा उत्सव आनंदात, उत्साहात साजरा करताना आपण पर्यावरणाला कोठे हानी तर पोहचवत नाही ना? याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. गणेशोत्सवात तलाव, समुद्रात होणाऱ्या बाप्पांच्या मुर्त्यांच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते.
पण यात सेलिब्रेटींचा संदेश महत्त्वाची भूमिका निभावत आहे. मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरने विसर्जनाबद्दल एक खास संदेश दिला आहे. या बदलाची सुरुवात त्याने स्वतःपासून केली आहे.
याचा एक खास व्हिडिओ सचिनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी सचिनने घरच्या घरी बादलीतच बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले. आणि त्याबद्दल आपले मतही व्यक्त केले.
व्हिडिओत सचिनने सांगितले की, "मरीन ड्राईववर गाडी चालवत असताना समुद्रात आपण जे टाकतो ते समुद्र परत जमिनीवर आणून टाकतो, हे मी पाहिले. ते मला खटकले. त्यामुळेच माझ्या मनात एक विचार आला की, बाप्पाचे विसर्जन घरीच केले तर... मग आई आणि गुरुजींच्या संमतीने आम्ही घरच्या घरी बाप्पाचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आणि लोकांनाही हा पर्यावरणपूरक निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे."