IPL Auction 2025 Live

Longest Kiss World Record: जगप्रसिद्ध चुंबन, तब्बल 58 तास किस करत जोडप्याने गेला विश्वविक्रम; Guinness नेही घेतली दखल

या स्पर्धेत एका थाई जोडप्याने (Thai Couple) चक्क सलग 58 तास 35 मिनीटे चुंबन घेतले. ज्याची नोंद जगातील सर्वाद दीर्घ काळ सुरु राहिलेले चुंबन म्हणून नोंद घेण्यात आली. एक्काचाई (Ekkachai) आणि लक्साना तिरनारत (Laksana Tiranarat) या जोडप्याने हा विक्रम केला.

Kiss | representative pic- (photo credit -pixabay

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) मध्ये एका हटके विक्रमाची नोंद झाली आहे. वरवर पाहता हा विक्रम साधा वाटत असला तरी तो करण्यासाठी स्पर्धकांना तब्बल 58 तासांचा अवधी लागला. होय, नुकतीच एक चुंबन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एका थाई जोडप्याने (Thai Couple) चक्क सलग 58 तास 35 मिनीटे चुंबन घेतले. ज्याची नोंद जगातील सर्वाद दीर्घ काळ सुरु राहिलेले चुंबन म्हणून नोंद घेण्यात आली. एक्काचाई (Ekkachai) आणि लक्साना तिरनारत (Laksana Tiranarat) या जोडप्याने हा विक्रम केला.

स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र, सर्वात लांब चुंबन घेण्याचा विक्रम थाई जोडप्याने जिंकला. एक्काचाई आणि लक्षाना तिरनारत, ज्यांचे चुंबन 58 तास आणि 35 मिनिटे चालले. हा कार्यक्रम 12 फेब्रुवारी 2013 रोजी पट्टाया येथे आयोजित करण्यात आला होता आणि दोन दिवसांनंतर विक्रम नोंदल्यावर संपला. या जोडप्याला 100,000 थाई बात ($3,300) आणि 100,000 बात किमतीच्या दोन डायमंड रिंग्जचे भव्य बक्षीस मिळाले. (हेही वाचा, Bombay High Court on Kissing: ओठांचे चुंबन, शरीरस्पर्श यात काहीही गैर नाही, आरोपीला जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय)

स्पर्धेतील नियम मजेशीर पण तितकेच कठीणही होते. नियमानुसार संपूर्ण स्पर्धेत स्पर्धकांनी ओठांना स्पर्श करणे आवश्यक होते. तसेच, एकमेकांच्या ओठांपासून विलग झाल्याशिवाय ते काहीही खाऊ किंवा पिऊ शकत नव्हते. ओठांचा संबंध कायम ठेवण्यासाठी स्पर्धकांना सदैव जागृत राहावे लागेल, असेही नियमात नमूद करण्यात आले होते.स्पर्धेदरम्यान जोडप्यांना टॉयलेट वापरता येतं होतं. पण त्यांना सतत चुंबन घ्यावं लागायचं. त्यातच ओठांना स्पर्षाची सलगता कायम ठेवण्याचे बंधन असल्यामुळे जोडप्यांना झोपताही येत नव्हते. परिणामी त्यांना इतर समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता होती. या आधीही असे अनेक वेळा घडले आहे.