Happy Valentine's Day 2019: Google ने जगभरातील सर्व प्रेमीकांसाठी अर्पण केले आजचे रोमँटीक Doodle
परंतु जेव्हा आपण त्याच्याही पुढे जातो तेव्हा खाली उतरता तेव्हा प्रेमाची सार्वभौम, निर्विवाद शक्ती दिसायला लागते. कारण या गोष्टी पैसे देऊन खरेदी करता येत नाहीत.
Valentine Week संपायला काही तासांचाच अवधी आहे. हा अवधी संपला की, जगभरातील असंख्य प्रेमीकांचा दिवस (14 फेब्रुवारी) अर्थातच Valentine's Day सुरु होणार आहे. ज्याच्याकडे ही मंडळी गेली अनेक महिने डोळे लाऊन बसलेली असतात. जगभरात हा दिवस साजरा करण्यासाठी प्रेमी युगुलं उत्साहीत आहेत. दरम्यान, या उत्साहात आनंदाचे रंग अधिक गडद करण्यासाठी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल (Google) सहभागी झाले आहे. त्यामुळेच गूगलने व्हॅलेंटाईन डेसाठी खास डूडल ( Doodle) तयार करुन जगभरातील प्रेमी जोडप्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) साजरा करण्याचे बरेच मार्ग आहेत. काही लोक त्या विशिष्ट व्यक्तीस त्यांची काळजी कशी घेतातत ते दर्शविण्यासाठी लाल गुलाब, कॅंडी किंवा कार्ड्स पाठवतात. इतर लोक एखाद्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी एखादा दिवस निवडतात, किंवा घरी रात्रीचे जेवण तयार करतात. परंतु जेव्हा आपण त्याच्याही पुढे जातो तेव्हा खाली उतरता तेव्हा प्रेमाची सार्वभौम, निर्विवाद शक्ती दिसायला लागते. कारण या गोष्टी पैसे देऊन खरेदी करता येत नाहीत. (हेही वाचा, Happy Valentine’s Day शुभेच्छा देण्यासाठी खास Romantic Quotes, Greetings, GIF Images,WhatsApp Messages,SMS; नक्की शेअर करा!)
व्हॅलेंटाईन डे म्हटलं की अनेक प्रेमवीरांना उत्साहाचं भरतं येतं. मग हे प्रेम दुतर्फी असो की एकतर्फी. समोरच्याच्या मनात काहीही असो. आज विचारुनच टाकू. या इराद्याने ही मंडळी कामला लागतात. यात तो आणि ती अशा दोघांचाही समावेश असतो. काही लोक तर म्हणे कित्येक दिवस अगोदर रंगीत तालीमही करतात. अखेर तो दिवस उजाडतो. हा तोच दिवस असतो (14 फेब्रुवारी, Valentine) ज्याची हे प्रेमवीर अनेक दिवस वाट पाहात असतात. आजवरचा असला नसला सगळा अनुभव, मार्गदर्शन याचा पुरेपूर वापर करत ही मंडळी धीर एकवटतात आणि एकदाचे समोरच्याला विचारुनच टाकतात. काही लोक या प्रकाराला प्रपोज करणे असेही म्हणात. काही लोकांना अपेक्षितपणे समोरुन होकार येतो. ही मंडळी क्षणात आकाशाला जाऊन टेकतात आणि आनंद साजरा करण्याच्या तयारीला लागतात. पण, बहुतेकांच्या नशीबी नकार येतो, अशा प्रकारे व्हॅलेंटाईन डे हा अनेकांसाठी वेगवेगळ्या आठवणींनी साकार होणारा एक अविस्मरणीय दिवस ठरतो.