Live-In Relationship मधील कटकटीमुळे त्रस्त? लग्नाआधी एकत्र राहताना 'या' गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी

तर कधी कधी आर्थिक स्थैर्य, स्वातंत्र्य, जबाबदारी नसणे, घटस्फोटाची भीती नाही यांसारख्या अनेक कारणानी तरुण लिव्ह-इनमध्ये राहतात

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

लग्नसंस्थेमधील विविध समस्यांमुळे तरुणांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. त्यामुळेच अलिकडे भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपचा (Live-In Relationship) ट्रेन्ड अधिक वाढलेला पाहायला मिळतोय. कधी कधी लग्नात पुढे जाऊन समस्या उद्भवू नये म्हणून आधी लिव्ह-इनमध्ये राहून एकमेकांना समजून घेण्यासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला जातो. तर कधी कधी आर्थिक स्थैर्य, स्वातंत्र्य, जबाबदारी नसणे, घटस्फोटाची भीती नाही यांसारख्या अनेक कारणानी तरुण लिव्ह-इनमध्ये राहतात. कारण किंवा अपेक्षा काहीही असो लिव्ह-इनमध्ये एकत्र राहताना अनेकवेळा जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता असते. यासाठी काही गोष्टींची काळजी ही तुम्हाला घ्यावीच लागते. चला तर पाहूया कोणत्या आहेत या गोष्टी

> एकत्र राहताना सर्वात प्रथम तुम्ही एकमेकांच्या कामाची वाटणी करणे गरजेचे आहे. घरातील कामे ही फार छोटी गोष्ट वाटत असली तरी, पुढे जाऊन याबाबत वाद-विवाद होण्याची शक्यता असते. कामाच्या बाबतीत हुकुमशाही न करता कामाची विभागणी झाली तर एकमेकांवर विसंबून न राहता घरातील कामे सुरळीत पार पडतील.

> लिव्ह-इनमध्ये राहताना शक्यतो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या जोडीदाराचीच निवड करा. एकदा का एकत्र राहायला सुरुवात झाली, की घरातील सर्व खर्च वाटून घ्या. तसेच स्वतःचे खर्च स्वतः करण्याकडे कल असुदे. पैशांमुळे नात्यात नेहमीच गैरसमज होतात, ते टाळण्याचा प्रयत्न करा.

> दोघांचीची गोष्टींची अथवा वस्तूंची पसंती वेगवेगळी असू शकते. त्यामुळे घरात दोघांनाही पसंत असतील अशाच गोष्टींची खरेदी करा. किंवा कोणतीही गोष्ट विकत घेण्याआधी आपल्या जोडीदाराला त्याची कल्पना द्या. तसेच एकमेकांच्या सवयींची सवय करून घ्या. अथवा ज्या सवयी खरच त्रासदायक असतील त्या बदलण्याचा प्रयत्न करा. (हेही वाचा: बॉयफ्रेंडसोबत नेहमीच खोटे बोलणाऱ्या गर्लफ्रेंड्स; नात्यात लपवून ठेवल्या जातात 'या' महत्वाच्या गोष्टी)

> लिव्ह-इनमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय हा दोघांचा असतो, त्यामुळे घरात येणारे मित्र, नातेवाईक यांचा निर्णयही दोघांनी एकत्र घ्या. तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ देऊ नका. तसेच दोघांमधील इंटीमेट माहिती, वैयक्तिक माहिती तिसऱ्या कोणासोबत शेअर करू नका.

> नाते प्रेमाने पुढे घेऊन जाण्यासाठी एकमेकांबद्दल आदर असणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल एकमेकांची तारीफ करत जा. भांडण झाले तर ते एकत्र बसून मिटवण्याचा प्रयत्न करा. लिव्ह-इनमध्ये राहताना शक्यतो प्रेग्नसी टाळा.

तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना या काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या जोडीदारानुसार या गोष्टी बदलू शकतात. मात्र नाते टिकवण्यासाठी दोघांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे