Sex Tips: बोअरिंग सेक्स लाईफचा कायापालट करण्यासाठी या भन्नाट टिप्स एकदा जरुर वाचा
काही सोप्प्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही तुमचं सेक्स लाईफ स्पाईस अप करू शकाल.
सेक्स (Sex) ही एक अशी गोष्ट आहे की जितकी करू तितकी मजा देऊन जाते, पण याकरिता तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करणं महत्वाचं असतं, जर का मानसिक शारीरिक किंवा अन्य काही कारणाने तुम्ही सेक्सच्या मूड मध्ये नसेल तर तुम्हाला हा सुखद अनुभव केवळ वाया गेलेली मेहनत वाटू शकते, काही कपल्सच्या बाबतीत ही समस्या अनेक वेळा उद्भवते, पण याचा अर्थ त्यांना एकमेकांविषयीचे आकर्षण कमी झालेय किंवा कंटाळा आलाय असा होते का? तर नाही. अनेकदा सेक्स केल्यावर आपल्याला आपल्या पार्टनरच्या शरीराची सवय होऊन नवीन सेक्स करण्याचा उत्साह निघून जातो पण प्रत्येक समस्येसारखाच यावर सुद्धा उपाय आहे. अगदी सोप्पा पर्याय म्हणजे प्रत्येकाने आपल्या सेक्स लाईफ मध्ये फँटसीज (Sexual Fantasies) आणि नवीन नवीन गोष्टी अनुभवणं गरजेचं आहे याने सेक्स लाईफ मधला रस टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे सुरवातीला आपल्या आणि पार्टनरच्या फॅन्टसीज ओळखून घेणे महत्वाचे आहे, यासोबतच या काही सोप्प्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही तुमचं सेक्स लाईफ स्पाईस अप करू शकाल.चला तर पाहुयात..
लॉन्जरी घालून करा पार्टनरला इम्प्रेस
सेक्स म्हणजे फक्त न्यूड शरीर नाही. पण ते शरीर अर्धवट दाखवून तुम्ही तुमच्या पार्टनरची उत्सुकता ताणू शकता. तुमच्या पार्टनरसमोर सुंदर आणि सेक्सी लाँजरी घालून त्याला स्वतःकडे आकर्षित करून घेत तुम्ही सेक्ससाठी उत्तेजित करू शकता. त्यामुळे पुढची प्रोसेस कितीभारी असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही.
फोरप्ले आणि डर्टी टॉकिंग
सेक्स म्हणजे काही पार्टनरच्या शरीरावर तुटून पडणे नाही त्यामुळे जरा अलगद स्टेप्स घेऊन फोरप्लेपासून सुरवात करत डर्टी टॉकिंग चा तडका देत ही प्रोसेस एन्जॉय करा. तुमच्या पार्टनरला काय हवयं हे एकदा कळलं की ते लगेच प्रत्यक्ष करून तुम्ही पुढे जाऊ शकाल.
मसाज मध्ये आहे ट्रिक
शारीरिक थकवा आल्याने अनेकदा सेक्स मध्ये एनर्जी कमी पडते त्यामुळे तुमच्या पार्टनरच्या तणावपूर्ण दिवसाचा थकवा दूर करण्यासाठी एक मसाज सेशन तुम्ही ट्राय करू शकता. यासाठी तुम्हाला आवडेल तसा चॉकलेट, ऑइल, आईस अश्या वस्तूंनी मसाज करू शकता. या सेन्शुअल मसाजने पार्टनर रिलॅक्स आणि उत्तेजित व्हायला मदत होईल. (Open Sex: जगातील 'या' पाच शहरांमध्ये सेक्स केला जातो खुलेआम, तुम्हाला यातील किती नावं माहित आहेत?)
सेक्स करण्याची जागा बदला
केवळ बेडरूम मध्ये सेक्स करण्याऐवजी घरातीलच अनेक कानाकोपऱ्यात तुम्ही सेक्सचा अनुभव घेउ शकता. बाथरूम सेक्स तर यासाठी सर्वात बेस्ट पर्याय ठरेल. शॉवरखाली आपल्या पार्टनरसोबत उभं राहून ते क्षण अनुभवण्याची वेगळीच मजा आहे.याशिवाय किचन किचनच्या ओट्यावर सेक्स करणे देखील अनेक कपल्सना फॅसिनेटिंग वाटते, जेवण बनवताना थोडं Kinky होण्याची संधी मिळताच कधीच दवडू नका.
थोडं रफ होऊ द्या!
अनेकदा तुम्ही सिनेमात भांडणानंतर सेक्स करणारे हिरो हिरोईन पहिले असतील अर्थात ते काही खरे नसले तरी ही कल्पना भन्नाट आहे. अनेकदा समोरच्याला काय वाटेल या भीतीने सेक्स पार्टनर्स रफ सेक्स करण्यापासून मागे हटतात. पण तुमच्या पार्टनर्शी बोलून एकदा हा अनुभव घ्यायला हरकत नाही एक वाईल्ड सेक्स सेशन तुमचं सेक्स लाईफ पूर्णतः बदलून टाकू शकता.
(टीप: वरील लेख हा माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, तुमच्या पार्टनरशी बोलून मगच या टिप्स ट्राय करा)