Sex Tips: Porn Addiction मुळे तुमच्या सेक्स लाईफ मध्ये होतो का बिघाड? जाणून घ्या उत्तर

पॉर्न पाहिल्याने चिडचिड होणे, प्रायव्हेट पार्ट इन्फेक्शनचा (Private Part Infections) धोका हे प्रत्यक्ष त्रास तर वाढू शकतातच पण सोबतच तुमच्या सेक्स लाईफवर एकूण परिणाम होऊ शकतो. कसा हे आता आपण या लेखातून जाणून घेऊयात..

. Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: File Image)

Porn Addiction: लॉक डाऊन (Lockdown) सुरु झाल्यापासून लोकांचे पॉर्न (Porn) पाहण्याचे प्रमाण वाढल्याचे अनेक पॉर्न वेबसाइट्सने (Porn Websites)  प्रसिद्ध केलेल्या निरीक्षणात समोर आले आहे. याचे कारण म्हणजे अनेकजण आपल्या पार्टनर पासून दूर आहेत तर काहींना आपल्या पार्टनरसोबत सतत एकाच पद्धतीने सेक्स (Sex) करण्याचा कंटाळा आल्याने निदान बघण्यात तरी व्हरायटी मिळावी याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक पॉर्न पाहण्याचे फायदे तोटे हा तसा चर्चेचा आणि मुळात वादाचा मुद्दा आहे, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीची सवय ही नेहमी वाईटच. पॉर्न पाहण्याची सवय सुद्धा तुम्हाला वैयक्तिक रित्या मोठे नुकसान पोहचवू शकते, अति पॉर्न पाहिल्याने चिडचिड होणे, प्रायव्हेट पार्ट  इन्फेक्शनचा (Private Part Infections) धोका हे प्रत्यक्ष त्रास तर वाढू शकतातच पण सोबतच तुमच्या सेक्स लाईफवर एकूण परिणाम होऊ शकतो. कसा हे आता आपण या लेखातून जाणून घेऊयात..

XXX Video: उत्तम सेक्स लाईफ साठी पार्टनरसोबत Porn पाहण्याचे होऊ शकतात 'असे' ही फायदे

Porn Addiction चा सेक्स लाईफवर काय होतो परिणाम?

- अनेकदा पॉर्न मध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी लोकांना इतक्या फॅन्सी वाटतात की त्या खऱ्या आयुष्यात सुद्धा करायचा अनेकजण प्रयत्न करतात आता त्या जमल्या तर ठीक अन्यथा पार्टनर्स मध्ये भांडणाला आयते कारण मिळते.

Porn Vs Real Life Sex: पॉर्न आणि खऱ्या आयुष्यातील सेक्स मध्ये आहेत 'हे' मोठे फरक; चुकूनही करू नका दोन्हींची तुलना

- अति पॉर्न पाहिल्याने खरा सेक्स जरा बोअरिंग वाटू शकतो.

-पॉर्न पाहिल्याशिवाय आपल्या पार्टनरला ऑर्गॅज्मच मिळत नाही अशीही तक्रार अनेकजण करतात.

- लिंगाचा आकार आणि स्टॅमिना यांची तुलना केली जाते. जर का यात आपला पार्टनर कमी पडला तर मग आणखीन भांडण होऊ शकते.

- सेक्स पोझिशन बाबत प्रत्यक्ष शक्य नसणाऱ्या अपेक्षा निर्माण होतात.

- अनेकदा पॉर्न पाहून अगोदरच हस्तमैथुन केलेलं असेल तर खरा सेक्स करताना ताकद उरत नाही.

दरम्यान, अति पॉर्न बघण्याचे व्यसन जर कोणाला लागले तर मग त्यांना त्यांच्या आजूबाजूला कोणीच नको असते. अशी माणसं ग्रुपमधून तुटू लागतात. अशी व्यक्ती हळू हळू एकलकोंडी होत जातात आणि माणसांसोबत राहणंच विसरून जातात, जर का त्रास वाढत असेल तर आम्ही सुद्धा आपल्याला वेळीच प्रोफेशनल मदत घेण्याचा सल्ला देऊ.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now