Sex Tips: भांडणानंतर सेक्स करण्यात येते अधिक मजा, अनुभव घेण्यासाठी 'या' आहेत काही प्रभावी ट्रिक्स

यासाठी काही मूड सेटिंग (Mood Setting) टिप्स कडे मात्र तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. काय आहेत या टिप्स चला तर पाहुयात..

Image For Representation (Photo Credits: File Image)

या जगात कोणतंही कपल असं नाही ज्यांच्यामध्ये भांडणं होत नाहीत. आणि मुळात नात्यातील जवळीक साधून ठेवायची असेल तर छोटीमोठी भांडणे ही व्हायलाच हवीत, पण या रागरुसव्याने तुमचं रिलेशन खराब होऊ द्यायचे नसेल तर दोघांनीही समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. भांडण सोडवण्यासाठी काहीजण शांततेचा तर काही जण संवादाचा मार्ग निवडतात मात्र आज आपण एक असा मार्ग बघणार आहोत ज्याने तुमचं भांडण तर मिटून जाईलच पण याशिवाय पार्टनर सोबत कधीही न अनुभवलेले काही सुखद क्षण ही अनुभवता येतील. हा मार्ग म्हणजे सेक्स (Sex), काही कपल्सशी साधलेल्या संवादात त्यांनी सांगितले की, जेव्हा कधी आम्ही भांडणानंतर सेक्स करतो तेव्हा दोघांचाही राग निवळून जातो आणि एक हॉट हार्डकोअर सेक्स (Hardcore Sex) केल्याने शारीरिक सुख देखील मिळते. यासाठी काही मूड सेटिंग (Mood Setting) टिप्स कडे मात्र तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. काय आहेत या टिप्स चला तर पाहुयात..

Sex and Weight Loss: फोरप्ले, ब्लोजॉब, फिंगरिंग सहित 'या' सेक्स ऍक्टिव्हिटी फॉलो केल्यास झटपट वजन कमी व्हायला होईल मदत; असे करा प्लॅनिंग

पुढाकार घ्या

भांडणाचा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर होऊ द्यायचा नसेल तर तुमच्यापैकी एकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. इगो बाजूला ठेवून तुमच्या पार्टनरच्या जवळ जा.

किसिंग

काही वेळा आपला पार्टनर भांडत असताना त्याने एकदाच तोंड बंद करावं असं वाटतं हो ना? त्यासाठी त्याला/तिला किस करून एकाच दगडात दोन पक्षी मारता येतील, या पॅशनेट किस नंतर तुमचा पार्टनर उत्तेजित तर होईलच आणि भांडणाचा मुद्दा देखील बाजूला सरून जाईल.

डर्टी टॉक

अनेक मुलींना सेक्स दरम्यान डर्टी टॉकिंग प्रचंड आवडते, त्यामुळे भांडण झालं असेल तर तुम्ही याच गोष्टीवरून सेक्स कडे वळू शकता. शक्यतो अपशब्द वापरणे टाळा किंवा तुमच्या पार्टनरच्या आवडीनुसार निर्णय घ्या. थोड्याश्या सेक्स टॉक मुळे तुमचा पार्टनर नक्की उत्तेजित करून मूड बदलायला मदत करेल.

हार्डकोअर सेक्स

आपल्या जोडीदारावर खूपच राग आलेला असेल पण अशावेळी यावर एक हार्डकोअर सेक्स सेशन (hardcore sex session) करून आपला राग आपल्या जोडीदाराकडे व्यक्त करा. यासाठी तुम्हाला अजिबातच वाईल्ड होण्याची गरज भासणार नाही. तुमच्या हालचाली आणि तुम्ही त्यांच्याशी ज्या प्रकारे वागत आहात त्यावरूनच तुमच्या जोडीदाराला तुमचा राग नक्की कळून येईल. पण दुसरीकडे उत्तेजित असल्याने तुमच्या सेक्स मुव्ह्ज कमाल करून जातील.

वास्तविक भांडल्यावर सेक्स केल्याचा फायदा असा की, जेव्हा सेक्स मधील परमोच्च क्षण गाठला जातो तेव्हा तुम्ही अगदी मोकळे फील करता. साहजिकच रंगामुळे शरीरात ऍक्टिव्ह झालेले हार्मोन्स देखील नियंत्रणात येतात. त्यामुळे भांडणानंतर सेक्स हा शारिरीक सुख आणि नात्याची जपणूक यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे यात तुमच्या पार्टनरची इच्छा मात्र जरूर लक्षात घ्या, जबरदस्ती करू नका!

(टीप- संबधित लेख हा प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)