Sex Tips for Valentine's Day: व्हॅलेंटाईन डे ची रात्र आपल्या पार्टनरसोबत अविस्मरणीय बनविण्यासाठी खास सेक्स टिप्स
सेक्स साठी तुमचे ठिकाण हे खूपच साजेसे असे पाहिजे. जिथे शांत आल्हाददायक वारा, खिडक्यांमधून पडणारा चंद्राचा कवडसा, बेड या गोष्टी तुमचा तुमच्या जोडीदारासोबतचा सेक्सचा अनुभव आणखीनच रोमांटिक करतील.
प्रेमाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) या दिवसाकडे पाहिले जाते. आपले समोरच्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्याचा हा दिवस...या दिवशी कपल्स खूप रोमांटिक मूडमध्ये असतात. हा रोमान्स वाढविण्यासाठी एका क्षणी ते एकमेकांच्या खूप जवळ येतात. ज्यातून संभोगाची (Sex) भावना निर्माण होते. मात्र व्हॅलेंटाईन डे सारख्या गोड दिवशी आपल्या जोडीदारासोबतचा सेक्सचा अनुभव देखील तितकाच रोमांटिक असला पाहिजे. त्यामुळे काही हटके आणि रोमांटिक गोष्टी करण्याची गरज आहे. अशा गोष्टी केल्याने तुमची व्हॅलेंटाईन डे ची रात्र खूपच अविस्मरणीय होऊन जाईल.
सेक्स साठी तुमचे ठिकाण हे खूपच साजेसे असे पाहिजे. जिथे शांत आल्हाददायक वारा, खिडक्यांमधून पडणारा चंद्राचा कवडसा, बेड या गोष्टी तुमचा तुमच्या जोडीदारासोबतचा सेक्सचा अनुभव आणखीनच रोमांटिक करतील.हेदेखील वाचा- Sex Tips for Valentine’s Day 2021: व्हॅलेंटाईन डे ला आपल्या जोडीदारासोबत सेक्सचा अनुभव अविस्मरणीय करण्यासाठी खास टिप्स
- रूममधील तापमानाचा फायदा करून घ्या
बेडरूममध्ये सेक्स दरम्यान चांगले वातावरण तयार करा. यावेळी काही थंड काही गरम गोष्टींचा वापर करा. उदा. सेक्स दरम्यान बर्फाचे तुकडे, सुगंधित अगरबत्ती, गरम पाण्याने जोडीदारासोबत शॉवर घ्या.
- रात्री एका हॉटेलमध्ये एखादा रूम बुक करा
आपल्या जोडीदारासोबत रात्र घालवायची असेल तर एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये रूम बुक करा. ज्यामुळे तुमचा सेक्सचा मूड आणखी चांगला होईल. यावेळी काही चांगल्या गोष्टी, शॅम्पेन वगैरे ट्राय करुन सेक्ससाठी चांगला मूड बनवा.
- सेक्स म्यूजिक प्लेलिस्ट बनवा
मोबाईलवर वा स्पीकरवर छान रोमांटिक आणि सेक्ससाठी उत्तेजित करतील अशी म्यूजिक प्लेलिस्ट बनवा. सेक्सदरम्यान ही गाणी सलग चालू राहतील. ज्यामुळे तुमचा चांगला मूडही बनेल आणि कोणताही अडथळा येणार नाही.
- रोल प्ले करा
तुम्ही दोघे घरात असाल तर तुमच्या लिव्हिंग रूममध्ये ही गाणी लावा आणि अशी कल्पना करा की तुम्ही एकमेकांसाठी अनोळखी आहात. ज्यामुळे तुम्ही एकमेकांजवळ याल. मग तसेच तुमच्या जोडीदाराला लिव्हिंग रूममधून बेडरूममध्ये घेऊन जा. ज्यामुळे दोघे सेक्ससाठी चांगले उत्सुक होतील.
एकमेकांसाठी अनोळखी राहून हा दिवस साजरा केलात तर एकमेकांविषयीची ओढ आणखीनच वाढेल आणि तुमचे नाते आणखी घट्ट होईल. तुमचे नाते तुम्ही पुन्हा एकदा नव्याने अनुभवाल.
(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2021 09:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

