प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

नवीन वर्षात मला बारीक व्हायचय, मला जाड व्हायचय यांसारखे अनेक संकल्प केले जातात हे आपल्या सर्वांना माहित आहेच. मात्र नवीन वर्षात सेक्सच्या बाबतीत देखील संकल्प करता येतात ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का? तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. नवीन वर्षात तुम्ही सेक्सशी संबंधित देखील संकल्प करु शकतात. जर तुम्ही याबाबत काही विचार केला नसेल तर आता देखील तुम्ही याबाबत विचार करु शकता. चांगले सेक्स लाईफ (Sex Life) बनविण्यासाठी वा ती कायम राखण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल. मात्र जर तुमची सेक्स लाईफ आनंददायी नसेल तर तुम्ही काही ठराविक गोष्टींचा संकल्प (Sex Resolution) करु शकता जो सेक्स लाईफ तजेलदार ठेवण्यासाठी कामी येतील.

त्यामुळे जर तुम्ही सेक्स जीवन आणखी चांगले आणि रोमांचक बनविण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही ठराविक गोष्टींचा संकल्प करणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे सेक्स लाईफ देखील आणखी चांगले बनेल.

1. व्यायाम

व्यायामामुळे न केवळ हृदयप्रणाली सुरळीत बनविण्यासाठी फायद्याचे ठरते. त्याचबरोबर कामेच्छा आणि सेक्सदरम्यान परमोच्च सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर व्यायाम नित्यनियमाने करणे गरजेचे आहे.हेदेखील वाचा- Benefits of Morning Sex: पहाटेच्या वेळी संभोग केल्यास सेक्स लाईफमध्ये होतील 'हे' चांगले बदल

2. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा

जेव्हा तुम्ही जास्त तणावाखाली असाल तर त्याचा परिणाम तुमच्या सेक्स हार्मोन्सवर होतो. ज्यामुळे कोर्टिसोल आणि एड्रेनालिन स्तर वाढतो.

3. आपल्या पार्टनरला समजून घेण्याचा प्रयत्न करा

सेक्स तज्ज्ञानुसार, अनेकदा जोडीदार आपल्या पार्टनरला सेक्सदरम्यान काय हवे आहे किंवा काय नको आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. म्हणून त्या गोष्टी आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

4. संवाद

जोडीदारांनी एकमेकांमधील संवाद वाढवावा. ज्यामुळे तुमची सेक्स लाईफ आणखी चांगली बनू शकते. ज्यामुळे सेक्स पोजिशन्स देखील तुम्हाला साधारण अंदाज येईल आणि तुमचे नाते देखील आणखी घट्ट होईल.

5. ठराविक झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा

तुम्ही ठराविक वेळेत झोपण्याचा प्रयत्न करा. झोप पूर्ण झाल्यास तुमचे सेक्स जीवन देखील आनंदी राहते.

सेक्स लाईफ चांगली राहण्यासाठी तुमचे खाणे-पिणे, झोप, ताणतणाव, शरीर या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे नवीन वर्षात सेक्ससाठी काही संकल्प करायचे असतील तर वर सांगितलेल्या गोष्टींचा नक्की विचार करा.