Sex Knowledge: सेक्स करताना या चुका टाळा, अन्यथा कमी होईल तुमची उत्तेजना

मात्र, काय करु नये हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळेच अनेकदा जोडपी सेक्स करत असताना एकमेकांच्या नकळत काही चुका घडतात आणि मग सगळा कार्यक्रमच कंटाळवाना होऊ जातो.

Sexual Arousal | (Photo Credit: iStock)

Sex Knowledge: जोडीदारासोबत लैंगिक सुखाची अनुभूती (Sexual Arousal) घेणं हे कोणत्याही जोडप्यासाठी एक परमोच्च सुखाचा क्षण. परंतू, अशा सुखाची अनुभूती घेताना अनेक मंडळी नकळत काही चुका करतात. ज्यामुळे जोडीदारातील उत्तेजनाच (Sexual Arousal) कमी होऊ शकते. तसं पाहता जोडीदासोबत लैंगिक अनुभूती (Sexual Experience) घेताना म्हणजेच सेक्स (Sex) करत असताना काय करावे हे बहुदा अनेकांना माहिती असते. मात्र, काय करु नये हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळेच अनेकदा जोडपी सेक्स करत असताना एकमेकांच्या नकळत काही चुका घडतात आणि मग सगळा कार्यक्रमच कंटाळवाना होऊ जातो.

सेक्स करताना जोडीदाराला सरप्राईज देणे ही उत्तेजना वाढविण्याचा एक प्रकार म्हटला जातो. पण, असे करताना आपला जोडीदार जर पूर्णपणे तयार मनस्थितीत नसेल तर, आपण भलतेपणा करायला जाऊ नका. उदा. आपल्या जोडीदाराच्या शरीराला हलकासा चावा घेतल्यास जोडीदार उत्तेजीत होऊ शकतो. मात्र, असे करताना तो जर कमातूर किंवा तशा मनस्थितीत नसेल तर आपल्या जोडीदालाला तुमचा हलकासा चावा (लव बाईट) वेदनादाई ठरु शकतो. त्यामुळे अचानक निर्माण झालेल्या वेदना पुढचा तुमच्या शरीससंबंधाच्या आनंदावरच विरजण पडू शकते. त्यामुळे कान, गाल किंवा खांद्यावर हलकासा लव बाईट तुम्ही देऊ शकता.

तुम्ही स्त्रीजोडीदार असाल आणि आपण आपल्या जोडीदारासोबत विमेन ऑन टॉप पोजिशन घेत असाल तर काळजी घ्या. आपल्या शरीराचे वजन किती आहे. ते स्वत:ला आणि आपल्या जोडीदाराला पेलवेल काय याचाही विचार करा. त्यामुळे या पोजीशनमध्ये आपले वजन आपल्याला किंवा आपल्या जोडीदाराला पेलले नाही तर, अपघात घडू शकतो. कधी काही प्रमाणात वजन न पेलल्याने श्वास घुसमटण्याचीही समस्या निर्माण होऊ शकेल. असे घडल्यानेही उत्तेजना कमी होते परिणामी सेक्समधील मजाही निघून जाऊ शकते.

अनेकदा काही लोकांना Raunchy म्हणजेच कामोत्तेजक सेक्स आनंददाई वाटतो. परंतू, अशा प्रकारचा किंकी सेक्स करत असताना आपण आपल्या जोडीदाराशी आगोदर बोलले पाहिजे. आपण त्याचे मन वळवायला हवे. जेणेकरुन दोघांनाही सेक्सचा आनंद घेता येईल. अन्यथा जोडीदाराच्या मनात सेक्स लादल्याची भावना निर्माण होऊन त्याची उत्तेजना कमी होऊ शकते. (हेही वाचा, Sex Knowledge: सेक्स केल्यावर पुरुष लगेचच डाराडूर झोपी का जातात...? अनेक महिला जोडीदारांनाही सतावतो हा प्रश्न)

आपल्या लैंगिक अनुभूतीबद्दल म्हणजेच सेक्स एक्सपीरियंस बद्दल जोडीदाराशी बोला. यात आपले आनंदी क्षण त्याला सांगा. त्याच्या चुका सांगू नका. दोघांनीही एकमेकांना कोणत्या प्रकारची लैंगिक कृती आनंद देऊन जाते हे कळले की दोघांचाही सेक्स एक्सपीरियंस आनंददायी ठरु शकेल. अशा प्रकारे काही चुका टाळल्या तर जोडीदारसह आपलीही लैंगिक उत्तेजना कमी होणार नाही. तसेच, लैंगिक अनुभूतीही आनंददायी ठरु शकेल.