Sex Drive Foods: सेक्सची इच्छा कमी झाली आहे? 'या' काही पदार्थांचे सेवन करून वाढवा तुमचा सेक्स ड्राइव्ह
निरोगी सेक्स ड्राईव्ह असणे हे शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी असण्याशी संबंधित आहे, म्हणूनच आपण खात असलेले पदार्थ आपले लैंगिक जीवन उत्तम ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जोडप्यांमध्ये सेक्सचे (Sex) प्रमाण कमी होण्याची समस्या वाढली आहे. अनेकवेळा आपण बाहेरच्या कामांनीच इतके थकून जातो की सेक्स करायची इच्छाही कमी होते व हळू हळू सेक्स ड्राईव्ह (Sex Drive) कमी होऊ लागतो. 15% पेक्षा जास्त पुरुषांना त्यांच्या आयुष्याच्या कधी ना कधी कमी सेक्स ड्राइव्हचा अनुभव येतो. आपणदेखील कमी सेक्स ड्राइव्ह आणि कामवासना कमी होण्याच्या समस्येने ग्रस्त आहात? तर कदाचित या लेखाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर, कमी सेक्स ड्राइव्हची समस्या आपण खात असलेल्या अन्नामुळे देखील होऊ शकते.
आपण जे खात आहात त्याचा आपल्या सेक्स लाइफवर खूप परिणाम होतो. निरोगी सेक्स ड्राईव्ह असणे हे शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी असण्याशी संबंधित आहे, म्हणूनच आपण खात असलेले पदार्थ आपले लैंगिक जीवन उत्तम ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. कोणताही निरोगी आहार सेक्ससाठी चांगला असतो. मात्र, अशा काही खास गोष्टी आहेत ज्याचा तुमच्या सेक्स लाईफवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. अक्रोड, स्ट्रॉबेरी, एवोकॅडो, टरबूज आणि बदाम असे काही हे पदार्थ आहेत.
मात्र लक्षात घ्या निरोगी लैंगिक जीवनासाठी अल्कोहोलचे सेवन अतिशय खराब आहे. अल्कोहोलमुळे कदाचित लैंगिक इच्छा वाढू शकते परंतु यामुळे कार्यक्षमता कमी होते.
अक्रोड: अक्रोड शुक्राणुंची गुणवत्ता सुधारते. शुक्राणूंचे आकार, हालचालीच्या सुधारणेसाठी अक्रोडचा फायदा होऊ शकतो.
स्ट्रॉबेरी आणि रसबेरी: या फळांच्या बियांमध्ये झिंक असते, जे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही लैंगिक संबंध सुधारण्यासाठी आवश्यक आहे. झिंक पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी नियमित करते, जे शुक्राणूंच्या निर्मितीस जबाबदार असतात.
एवोकॅडो: निरोगी सेक्स ड्राईव्हसाठी फॉलीक एसिड आणि व्हिटॅमिन बी 6 आवश्यक आहेत. फॉलिक एसिड शरीरास उर्जा देऊन पंप करते, तर व्हिटॅमिन बी 6 संप्रेरकांना स्थिर करते.
टरबूज: टरबूज तुमच्या लिंगाच्या ताठरतेसाठी महत्वाचे असून, तुमची कामेच्छा वाढवते.
बदाम: बदामांमध्ये आर्जिनिन असते जे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तवाहिन्यांना आराम देते.
चॉकलेट: डार्क चॉकलेट सेरोटोनिन आणि एंडोर्फिन रिलीज करते ज्यामुळे आपला मूड सुधारतो.
तर अशा काही पदार्थांचे सेवन केल्याने तुमची सेक्सची इच्छा आणि ड्राईव्हमध्ये फरक पडण्यास मद्त होऊ शकते.