Sex Dreams: इंटरकोर्स, मास्टरबेशन आणि सेक्स संबंधित पडलेल्या स्वप्नांचा अर्थ काय होतो माहितीय का? अशा पद्धतीचे Dreams देतात 'हे; संकेत
Sex Addiction | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Sex Dreams: सेक्स आणि सेक्स संबंधित स्वप्ने पाहणे ही साधारण गोष्ट आहे. अशा पद्धतीची पडलेली स्वप्न चांगली नसल्याचे मानत त्याबाबत लाज सुद्धा बहुकांत लोकांना वाटते. परंतु सेक्स संदर्भात स्वप्न पडणे हे अनन्यसाधारण बाब असून त्यावर आपण नियंत्रण मिळवू शकत नाहीत. विवाहित कपल्ससाठी त्यांच्या आयुष्यातला सेक्स लाईफ हा सुद्धा एक महत्वाचा हिस्सा आहे. परंतु इंटरकोर्स, मास्टरबेशन आणि सेक्स संबंधित पडलेली स्वप्ने लोक गांभीर्याने घेतात. ऐवढेच नाही या स्वप्नांबाबत आपली मत सुद्धा व्यक्त करतात. सेक्स संदर्भात पडलेली स्वप्न यामागे काही कारणे किंवा काही संकेत सुद्धा असू शकतात.

अमेरिकन अॅकाडमी ऑफ स्लीप मेडिसन यांच्या द्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, सेक्स संदर्भातील स्वप्ने ही इंटरकोर्स, हस्तमैथून आणि फँटेसी  बाबत असतात. लोकांना झोपल्यावर फक्त सेक्सची स्वप्न येऊ शकतात. त्याचसोबत झोपण्यावेळी त्यांना ऑर्गेज्मचा सुद्धा अनुभव येऊ शकतो. बहुतांश पुरुषांना नाइट फॉल सेक्स संबंधित स्वप्न पडण्याची शक्यता अधिक असते.

येथे असा प्रश्न उपस्थित होतो की सेक्स ड्रीमचा नक्की अर्थ काय आहे? स्वप्नांबाबत समजून घेणे थोडे कठीणच आहे. कारण ही एक दैनंदिन जीवनातील एक घटना आहे. मात्र काही अशा गोष्टी आहेत ज्याचा संबंध सेक्स संदर्भातील स्वप्नांबाबत असू शकतो. तर जाणून घ्या  इंटरकोर्स, मास्टरबेशन आणि सेक्स संबंधित पडलेल्या स्वप्नांचा अर्थ काय होतो.(Sex Bucket List: तुमची सेक्स लाईफ आणखी रोमांचक बनविण्यासाठी आपल्या जोडीदारासोबत ट्राय करा 'या' सुपरहॉट आयडियाज)

- प्रचंड प्रमाणात पॉर्न पाहणे

खुप जास्त वेळ पॉर्न पाहणे हे सुद्धा कारण सेक्स ड्रीमसाठी पुरेसे आहे. कारण झोपल्यानंतर तुम्हाला पॉर्न पाहिल्यालर सेक्स संदर्भातील स्वप्न पडू शकतात. जर तुम्ही अधिकच पॉर्न पाहत असल्यास तर झोपच्या वेळात तुमच्या डोक्यात पॉर्न क्लिप सुरु असून त्याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे राहिल्याचे वाटू शकते.

-एखाद्या व्यक्तीसाठी आकर्षण

ज्या वेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रति आकर्षित होतात आणि त्याच्या सोबत तुम्हाला शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा किंवा शक्यता असेल. तर अशा वेळी  तुम्ही त्या व्यक्तीसोबतच्या सेक्स बाबत स्वप्न पाहू शकता. आकर्षण हे सुद्धा सेक्सचे स्वप्न पडण्यामागे एक कारण ठरु शकते.(Losing Your Virginity: तुम्ही तुमची वर्जिनिटी गमावणार आहात? पहिल्यांदा सेक्स करताना 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा)

-सेक्सचा अभाव

जर तुम्ही खुप महिन्यांपासून एकादी सेक्स केले नसेल पण तुम्हाला करावेसे वाटत असेल तर सेक्स संदर्भातील स्वप्न जरुर पाहू शकता. अशा पद्धतीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये सेक्स बाबत पडलेल्या स्वप्नांसाठी हे एक कारण ठरले आहे.

सेक्सचे स्वप्न पडणे म्हणजे असे नाही ते सत्यात होणार आहे. परंतु सेक्सची स्वप्ने तुम्हाला त्याबाबत संकेत देऊ शकतात.

(सूचना- वरील दिलेली माहिती सुचनात्मक उद्देशाने लिहिली आहे. या बाबत कोणतीही पुष्टी लेटेस्टली मराठी कडून करण्यात आलेली नाही. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची बौद्धिक क्षमता वेगळी असते हे लक्षात असू द्या.)