Reasons Of Less Interest In Sex: सेक्स करण्याची इच्छा का वाटत नाही? जाणून घ्या 5 महत्वपूर्ण कारण

यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन विस्कळीत होते.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

Reasons Of Less Interest In Sex: आपण नेहमीच पाहतो की काही कपल्समध्ये सेक्स करण्यापूर्वीच त्यांची त्यासाठीची इच्छा होत नाही. यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन विस्कळीत होते. याच कारणामुळे घटस्फोट सुद्धा होऊ शकतो आणि हसत्या खेळत्या आयुष्यात ग्रहण लागल्यासारखे होते. सेक्स मुळे शारिरीक आणि मानसिक रुपात तुम्हाला आनंद मिळतो. मात्र सेक्स करण्याची तुमची इच्छा नसल्यास पार्टनर सुद्धा असंतुष्ट राहतो आणि तुमच्यामध्ये भांडण होण्यास सुरुवात होते. यासाठीच काही सामान्य कारणांबद्दल विश्लेषण केले आहे. त्यामुळे नव्या कपल्सला या काही गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.

-तणाव मुख्य कारण ठरु शकते

महिलांमध्ये सेक्स बद्दल त्या संतुष्ट नसतील तर त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो. यामुळे त्यांच्या सेक्स लाइफला सुद्धा फटका बसू शकतो. याबद्दल बहुतांश महिलांनी सुद्धा मान्य केले आहे. काही महिलांमशध्ये मानसिक दबाव जरी असला तरीही सेक्स करण्याची त्यांची इच्छा होत नाही.

-आजारपण सुद्धा ठरु शकते कारण

कपल्समध्ये कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार त्यांच्या सेक्स लाइफवर परिणाम करु शकतो. या अशा आजारांवर घेत असलेल्या औषधांमुळे सुद्धा सेक्स लाइफ नकोसे काही वेळेस वाटते. ऐवढेच नव्हे तर जुने उद्भवलेले आजार सुद्धा सेक्स लाइफवर परिणाम करु शकतात.

-हार्मोन्समध्ये असंतुलितता 

हार्मोन्समध्ये असंतुलितता जसे कोर्टिसोल, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोन आणि थायरॉइड हार्मोन, सेक्स ड्राइव्ह प्रभावित करु शकते. सध्याच्या दिवसात तणावामागील कारण हे कोर्टिसोलचा स्तर हा वाढला किंवा कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे. एस्ट्रोजेन मुख्यत: महिल्यांच्या सेक्स हार्मोन्समध्ये असंतुलितचे कारण ठरु शकते. एस्ट्रोजनच्या वाढत्या किंवा कमी स्तरामुळे सूज येणे. वजन वाढणे, मूड खराब होणे अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात. यामुळे तुम्ही उत्तम डॉक्टरचा सल्ला यासाठी घेऊ शकता.

-अतिप्रमाणात धुम्रपान किंवा दारु पिणे सेक्स लाइफवर परिणाम करु शकतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जर तुम्ही कमी केल्यास तुमची सेक्स लाइफ सुधारु शकते.

-त्याचसोबत कपल्समध्ये एकमेकांच्या प्रति दुर्व्यवहार किंवा अपमान केल्याने सुद्धा सेक्स लाइफमध्ये तणाव निर्माण होते.यामुळे लहानसहान कारणांमुळे झालेली भांडणे तुम्ही विसरु जाणे हेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.