रेमंडचे Gautam Singhania यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया पासून वेगळे होण्याची घोषणा

ते टेक्सटाइल-टू-रिअल इस्टेट समूह रेमंड लिमिटेडचे (Raymond Ltd) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

Gautam Singhania | (Photo Credits: Instagram)

उद्योगपती गौतम सिंघानिया (Gautam Singhania) पत्नी नवाज मोदी (Nawaz Modi) यांच्यापासून विभक्त होत आहेत. ते टेक्सटाइल-टू-रिअल इस्टेट समूह रेमंड लिमिटेडचे (Raymond Ltd) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही दोगांनी वेगवेगळे मार्ग अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे. 58 वर्षीय सिंघानिया यांनी 1999 मध्ये सॉलिसिटर नादर मोदी यांची 29 वर्षांची मुलगी नवाज मोदी यांच्याशी लग्न केले होते. गौतम सिंघानिया हे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. ते आपल्या रेमंड या ब्रँडसाठी ओळखले जातात. सिंघानिया दाम्पत्याच्या या निर्णयामुळे त्यांच्या हितचिंतकांना मोठा धक्का बसला आहे.

ही दिवाळी पूर्वीसारखी असणार नाही

रेमंड ब्रँडचे सर्वेसर्वा असलेल्या उद्योगपतीने आपल्या एक्स हँडलवर लिहीलेल्या इंग्रजी पोस्टचा मराठी भावार्थ असा की, ही दिवाळी पूर्वीसारखी असणार नाही. माला वाटते की, आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर नवाज आणि मी येथून पुढे वेगवेगळे मार्ग अवलंबू. एक जोडपे म्हणून आम्ही 32 वर्षे एकत्र राहिलो. आम्ही आई-वडील म्हणून वाढलेली आणि नेहमी एकमेकांची ताकद बनण्याची आमची वचनबद्धता, संकल्प यांबाबत विश्वासाने मार्गक्रमण केले, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, उद्योगपतींनी त्यांच्या विभक्तीनंतर मुलांच्या ताब्याबाबत कोणताही तपशील दिला नाही. मात्र आम्ही आमचे दोन मौल्यवान हिरे निहारिका आणि निसा यांच्यासाठी जे सर्वोत्तम असावे असे सर्व काही केले आहे. ते केल्यानंतरच आम्ही एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे म्हटले आहे.

ट्विट

उल्लेखनीय असे की, विभक्त होण्याची घोषणा करण्याच्या काही मिनिटांपूर्वी, गौतम सिंघानिया यांनी X वर लिहिले की त्यांच्या समूहाच्या रिअल इस्टेट शाखा संपूर्ण मुंबईत आपला विस्तार वाढवत आहेत. आम्ही (मुंबई मेट्रोपॉलिटन) प्रदेशात 3 नवीन रिअल इस्टेट प्रकल्प सुरु केले आहेत. ज्यात 5,000 कोटी ($678 दशलक्ष डॉलर्स) च्या एकत्रित कमाईची क्षमता आहे. आमच्या रियल्टी व्यवसायात गेल्या काही प्रकल्पांमध्ये मजबूत वाढ झाली आहे. आगामी प्रकल्पांसाठी रेमंड ग्रुपशी संबंधित उच्च दर्जाची गुणवत्ता आणि कौशल्य प्रदान करण्याचा आम्हााल विश्वास आहे.

गौतम सिंघानिया यांची कौटुंबीक पातळीवर चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. वडील विजयपत सिंघानिया यांच्याशी झालेल्या भांडणावरुनही सिंघानिया हे काही वर्षांपूर्वी चर्चेत आले होते. जयपत सिंघानिया यांनी रेमंड ग्रुप तयार केला. जो भारतातील घराघरात पोहोचलेले नाव बनला. हा ब्रँड आणि कापड तयार करतो. त्याचा मुलगा, गौतम यांनी महसूल वाढवण्याच्या प्रयत्नात समूहाला अधिक क्षेत्रांमध्ये विविधता आणली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif