Porn Addiction: पॉर्न पाहण्याच्या व्यसनापासून कशी कराल सुटका?
भारतात पॉर्न संकेतस्थळांवर बंदी आहे. असे असले तरीही लोक पॉर्न पाहतात. त्याबाबतचे विविध सर्व्हे अनेकदा बोलके असतात. काही लोकांना तर पॉर्न पाहण्याचे व्यसनच (Porn Addiction) लागलेले असते.
How To Avoid Porn Addiction: जगभरातील अनेक लोक पॉर्न (Porn) पाहात असतात. पॉर्न हा इंटरनेटच्या दुनियेतील सर्वात अधिक पाहिला जाणारा घटक आहे. भारतातही पॉर्न पाहणाऱ्यांची कमी नाही. भारतात पॉर्न संकेतस्थळांवर बंदी आहे. असे असले तरीही लोक पॉर्न पाहतात. त्याबाबतचे विविध सर्व्हे अनेकदा बोलके असतात. काही लोकांना तर पॉर्न पाहण्याचे व्यसनच (Porn Addiction) लागलेले असते. अनेकांना या व्यसनापासून सुटका हवी असते. पण, वास्तवात तसे घडत नाही. पण मनात आणले तर काहीही होऊ शकते. आम्ही येथे काही पर्याय सूचवत आहोत. या पर्यायांचा वापर करुन आपणास पॉर्न पाहण्याच्या व्यसनापासून सूटका करुन घेऊ शकता.
पॉर्न पाहण्याचे व्यसन सोडविण्यासाठी इथे आम्ही काही जे पर्याय अथवा टीप्स देत आहोत तो आमचा (लेटेस्टली मराठी) दावा नाही. वाचकांनी ही माहिती आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर वाचावी आणि अमलात आणावी. गरज पडल्यास वैद्यकीय अथवा मानसोपचारतज्ज्ञाचाही सल्ला घ्यावा.
आपल्यापैकी अनेकांना पॉर्न पाहण्याचे आपणास व्यसन आहे हेच माहिती नसते. पॉर्न पाहण्याचे व्यसन ओळखण्याच्या काही सोप्या ट्रीक आहेत. जसे की, तुम्ही जर दररोज पॉर्न पाहात असाल, पॉर्न पाहण्यासाठी दिवसभरातील कोणताही वेळ तुम्हाला चालत असेल, पॉर्न पाहण्यासाठी तुम्ही एक्साईट असाल अथवा तुम्ही पॉर्न क्लिप्स, व्हिडिओ आदींचा साठा केला असेल तर समजून जा की तुम्ही पॉर्न पॉहण्याच्या व्यसनाधीन आहात. (हेही वाचा, Anal Sex Problems: गुदमैथुन करताना जोडीदारासमोर होऊ शकते तुम्ही फजिती; सेक्स करताना घ्या 'या' गोष्टींची काळजी )
पॉर्न पाहण्यापासून स्वत:ची सुटका करुन घ्यायची असेल तर, प्रथम आपल्याकडील सर्व क्लिप, पॉर्न व्हिडिओ साठा नष्ट करा. पॉर्न पाहणे एकदम बंद करु नका. पण ते पाहण्याचे प्रमाण कमी करा. त्यासाठी वाचन, लेखण, चित्रपट पाहणे, वेळ मिळेल तेव्हा मोकळ्या वातावरणात फिरायला जाणे सुरु करा. काहीतरी निमित्त काढून घरातील किराणा सामाना, किरकोळ खरेदी करण्यासाठी बाहेर पडा. आपले छंद शोधा (पॉर्न पाहणे सोडून) . आपल्या छंदाला वेळ द्या. एखादा क्लास जॉईन करा. मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवा. घरातील ज्येष्ठ नागरिकांशी बोलत राहा. तुम्ही स्वत: ज्येष्ठ असाल तर घरातील छोटी मुलं, मंदिरं... ज्येष्ठ नागरिक कट्टा आदींसोबत वेळ घालवा. जीवनातील सुंदर क्षणांची आठवण करा, असे केल्याने तुम्ही पॉर्न पाहण्याचे व्यसन हळूहूळू कमी करत त्यापासून मुक्ती मिळवू शकाल.