Miracle of Love: पत्नीच्या प्रेमापोटी वनस्पतिजन्य अवस्थेतून परतला पती, 10 वर्षे होता कोमात

प्रेम काय करु शकते? प्रेमाची ताकत काय? या प्रश्नाचे उत्तर एकच. ते म्हणजे प्रेम काहीही करु शकते. कधीही, कोठेही, कोणासाठीही. मानत फक्त प्रेमाची भावना आणि उर्मी हवी. दावा केला जात आहे की, चीनमधील अनहुई प्रांतातील रहिवासी असलेल्या सन होंग्झिया या महिलेने तिच्या पतीस वनस्पतीजन्य अवस्थेतून म्हणजेच कोमातून परत आणले आहे.

Husband Wife Relationship | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Devoted Wife And Husband: प्रेम काय करु शकते? प्रेमाची ताकत काय? या प्रश्नाचे उत्तर एकच. ते म्हणजे प्रेम काहीही करु शकते. कधीही, कोठेही, कोणासाठीही. मानत फक्त प्रेमाची भावना आणि उर्मी हवी. चीनमधील अनहुई प्रांतातील रहिवासी असलेल्या सन होंग्झिया या महिलेने याची प्रचिती घडवली आहे. दावा केला जात आहे की, सन होंग्झिया या महिलेच्या पतीस सन 2014 मध्ये हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे तो वनस्पतीजन्य अवस्थेत गेला. वनस्पतीजन्य अवस्था (Vegetative State) म्हणजे एक प्रकारे कोमात जाणे. पती कोमात (Man in Coma) असला तरी या महिलेचे त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. ती त्याच्यावर अविरत प्रेम करतच राहीली. तिने त्याची सुश्रुषा करणे कायम ठेवले. तिचा नवरा अर्धवट बेशुद्धावस्थेत पडल्यावर त्याच्या जगण्याची आशा सोडण्यास तिने नकार दिला. त्याच्या बरे होण्यावरचा तिचा अढळ विश्वास शेवटी फळाला आला. अखेर एकदोन नव्हे तर तब्बल 10 वर्षांनी तिचा पती वनस्पतीजन्य अवस्थेतून बाहेर आला. प्रेमातील चमत्कार आणि महिलेची समर्पण वृत्ती पाहून तिच्या नावाची समाजात जोरदार चर्चा आहे.

अमर्याद प्रेम आणि समर्पण

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक वर्षे केलेली तपश्चर्या, आतीव काळजी आणि अमर्याद प्रेम यांमुळेच तिचा पती कोमातून परत आल्याचे मानले जात आहे. चीनमधील सोशल मीडियावर या महिलेबद्दल माहिती देणारी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. जी हाँग्झिया आणि तिच्या पतीसोबत झालेल्या पुनर्मिलनाची भावना दर्शवते. व्हिडिओमध्ये महिलेच्या चेहऱ्यावर ओघळणारे आनंदाश्रू बरेच काही सांगून जातात. (हेही वाचा, Man Kills Wife for Medical Bills: वैद्यकीय खर्च भरण्यात अपयश, पतीने रुग्णालयातच घोटला पत्नीचा गळा)

कोमात असलेल्या पतीच्या सर्व गरजा पूर्ण

पतीस हृदयविकाराचा झटका आल्याने पत्नी हाँग्झिया हिस आणि कुटुंबाला  मोठा धक्का बसला आणि दु:ख झाले. तरीही ती डगमगली नाही. तिने आपल्या दोन मुलांकडून शक्ती मिळवली, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आशा आणि लवचिकता टिकवून ठेवण्याचा निर्धार केला. तिचे अढळ प्रेम आणि लक्ष तिच्या पतीवरच राहिले. तो बेशुद्ध असतानाही तिने त्याच्या तत्कालीन असलेल्या सर्व गरजा पूर्ण केल्या. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले. (हेही वाचा, Thane Crime: पतीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घरगुती वादातून कृत्य; 61 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल)

प्रदीर्घ कोमामुळे पतीसमोर असंख्य शारीरिक आव्हाने निर्माण झाली. ज्यामुळे ट्रेकीओस्टोमी आणि युरिनरी कॅथेटर सारख्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती. कठीण परिस्थिती आणि अडथळ्यांना न जुमानता होंग्झिया आपल्या प्रेमात समर्पण देत राहिली आणि पतीची सेवा करत राहिली. तिच्या प्रेमाबद्दल पतिच्या 84 वर्षीय वडिलांनी आतीव आदर व्यक्तकेला. तिची प्रशंसा केली आणि तिच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. हाँग्झिया केवळ सूनच नव्हे तर एक देवदूतही असल्याचे ते म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now