जास्त Sex करणाऱ्या महिलांमध्ये Menopause ची शक्यता कमी; रिसर्चमधून मासिक पाळीबद्दल आश्चर्यकारक खुलासा
अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, जर स्त्री वरचेवर लैंगिक संबंध ठेवत नसेल आणि तिला गर्भधारणा होण्याची शक्यता नसेल, तर शरीर ओव्हुलेशन थांबवते कारण ते व्यर्थ ठरते
Sex Survey: ज्या स्त्रिया जास्त संभोग (Sex) करतात किंवा जास्त शारीरिक संबंध ठेवतात, त्यांना रजोनिवृत्तीची (Menopause) शक्यता कमी असते. आठवड्यातून एकदा संभोग करत असलेल्या महिलांमध्ये रजोनिवृत्तीची संभाव्यता, ही महिन्यातून एकदा संभोग करणार्या महिलांपेक्षा 28 टक्के कमी आहे. एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, ज्या मिड लाईफ (35 वर्षे आणि त्याहून अधिक) स्त्रिया वरचेवर लैंगिक संबंध ठेवत नाहीत, अशांमध्ये रजोनिवृत्ती लवकर दिसून येते.
लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधक मेगन अर्नोट याबाबत म्हणतात की, ‘अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, जर स्त्री वरचेवर लैंगिक संबंध ठेवत नसेल आणि तिला गर्भधारणा होण्याची शक्यता नसेल, तर शरीर ओव्हुलेशन थांबवते कारण ते व्यर्थ ठरते.’ अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, ओव्हुलेशन दरम्यान, महिलेची प्रतिकारशक्ती बिघडते, ज्यामुळे शरीर रोगास बळी पडते. हे संशोधन 1996/1997 मध्ये, 2,936 महिलांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे.
यावेळी स्त्रियांना अनेक पश्न विचारण्यात आले, यामध्ये मागील सहा महिन्यांत त्यांनी आपल्या जोडीदारासह सेक्स केला आहे का नाही? असे वैयक्तिक प्रश्नही सामील होते. त्यांना लैंगिक संभोगाव्यतिरिक्त, गेल्या सहा महिन्यांत लैंगिक उत्तेजनांशी संबंधित इतर प्रश्न देखील विचारले गेले होते. यामध्ये ओरल सेक्स, समागम, लैंगिक स्पर्श आणि आत्म-उत्तेजन किंवा हस्तमैथुन याबद्दल तपशीलवार माहिती देखील घेण्यात आली होती. (हेही वाचा: Sex Tips: Boring सेक्स लाईफ Interesting करण्यास मदत करतील या '5' भन्नाट आयडियाज)
लैंगिक क्रियेमध्ये भाग घेण्यासंबंधी सर्वात जास्त उत्तरे (64 टक्के) ही 'आठवड्यातून एकदा' ही होती. दहा वर्षांच्या अनुक्रमेच्या घटनेत दिसून आले की 2,936 स्त्रियांपैकी 1,324 (45 टक्के) स्त्रियांना सरासरी 52 व्या वर्षी नैसर्गिक रजोनिवृत्तीचा अनुभव आला आहे. दरम्यान स्त्रियांमध्ये मासिक पाळी थांबण्याच्या क्रियेला रजोनिवृत्ती म्हटले जाते.