प्रत्येक जोडप्यामध्ये या 5 गोष्टी असतात भांडणाची कारणे, कसा काढाल तोडगा?

नात्यात आलेला हा कडवटपणा दूर करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल जेणे करुन ते जोडपे आणि त्यांच्यातील ते गोड नाते कायम राहील यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

Relationship (Photo Credits: PixaBay)

लवकरच विवाह बंधनात अडकणारे एक मुलगा आणि एक मुलगी आपल्या नवीन आयुष्याची जणू स्वप्नच पाहू लागतात. आणि जेव्हा त्यांचे लग्न होते तेव्हा काही दिवस तो अनुभव, तो राजा-राणीचा संसार खूप चांगला वाटू लागतो. मात्र जसजसा वेळ निघत जातो, तसे तसे त्या जोडप्यामधील तो नवखेपणा कमी होत जातात. ते म्हणतात नव्याचे नऊ दिवस तसेच काहीसे या जोडप्याबाबत घडायला सुरुवात होते. नेहमी आनंदी, मजेत राहणारे हे जोडपे अचानक काही समस्येमध्ये अडकत जातात. तर काही नात्यात निर्माण होणा-या या समस्यांपुढे गुडघे टेकून नात्याचा अंत ही करतात. ज्याला आपण घटस्फोट असे म्हणतो.

मात्र या सर्वांमध्ये ते जोडपे त्यांच्या भांडणाचे मूळ कारण काय होते किंवा त्यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न देखील करत नाही. नात्यात आलेल्या कडवट पणाला कंटाळून घटस्फोटाचा मार्ग अवलंबतात. नात्यात आलेला हा कडवटपणा दूर करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल जेणे करुन ते जोडपे आणि त्यांच्यातील ते गोड नाते कायम राहील यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्याचा नक्कीच तुमच्या सुखी संसारासाठी उपयोग होईल.

1. पैशांसंबंधित समस्या

लग्नानंतर जोडप्यांमध्ये वाढत्या गरजा आणि खर्चांना घेऊन नेहमीच ताणतणाव पाहायला मिळतात.पैशांना घेऊन होणा-या भांडणामुळे नात्यात कडवटपणा येतो. यासाठी समजूतदारपणा दाखवून घर-खर्च आपापसांता वाटून घ्या. त्याशिवाय बचत आणि खर्चाला घेऊन एकमेकांशी मत जाणून घ्या. एकमेकांसोबत बोला.

2. असुरक्षिततेची भावना

पती-पत्नींनी आपल्या नात्यात कितीही डोळे बंद करुन विश्वास दाखवला तरीही एक असा टप्पा येतो जेव्हा आपण पती-पत्नी विनाकारण एकमेकांवर संशय घेण्यास सुरुवात करतात. त्यामुळे रोज जोडप्यांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडणास सुरुवात होते. म्हणून एकमेकांमध्ये संवाद ठेवा. काही शंका असतील तर एकत्र बसून त्या दूर करा.

3. एकमेकांबद्दल ईर्ष्येची भावना

वैवाहिक जीवनात एक असा टप्पा येतो, जेव्हा आपल्याला एकमेकांविषयी ईर्ष्या निर्माण होते. बहुतांशी जोडप्यांमध्ये ही भावना नोकरी संदर्भातच असते. त्यामुळे प्रयत्न करा की अशी भावना आपल्या मनात निर्माण होऊ देऊ नका. आणि जर अशी ईर्ष्येची भावना निर्माण झाली तर, आपल्या जोडीदारासह याविषयी चर्चा करा.

हेही वाचा- महिला 'या' काही कारणांमुळे कोणत्या ना कोणत्या नात्यात राहतात

4. स्वभावातील भिन्नता

लग्नानंतर सुरुवातीला एकमेकांना खूश ठेवण्यासाठी पति किंवा पत्नी एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीत सहमती दर्शवतात. जरी त्यांचा स्वभाव भिन्न असला तरीही, एकमेकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कालांतराने आपल्या जोडीदाराने आपल्या कोणत्या गोष्टीला विरोध दर्शविला की आपली चिडचिड होते आणि मग तुमचे जोडीदार आधी कसा होता आणि आता किती बदलले यातील फरक सांगायला सुरुवात करतात, ज्यामुळे त्या दोघांत भांडणे होतात. म्हणूनच सुरुवातीपासूनच एकमेकांचे स्वभाव समजून घ्या आणि एकमेकांचा सम्मान करण्याचा प्रयत्न करा.

5. फोनमध्ये सतत व्यस्त राहणे

आजकालचे रिलेशनशिप किंवा लग्न तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल आहे. सध्या मोबाईल सोशल मिडियाचा अतिवापरामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा शक्यतो मोबाईलचा अतिवापर टाळा. कामापुरते अथवा गरजेपुरतेच मोबाईलच्या संपर्कात राहा. अन्यथा आपल्या जोडीदाराशी दिवसभराच्या चर्चा करा. एकमेकांविषयी चौकशी करा. जेणेकरुन तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही.

आई-वडिल होणं सोपं नाही, कसा अनुभवाल तो नऊ महिन्यांचा अद्भूत प्रवास? वाचा हा विशेष लेख

अनेकदा आपण आपल्या जोडीदाराकडून ज्या अपेक्षा करतो, त्या पुर्ण झाल्या नाही की नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदाराशी अगदी निर्धास्त होऊन बोला. कारण या त्या समस्या आहेत जे प्रत्येक जोडप्याला कधी ना कधी आयुष्यात सामना करावा लागतो. अशा वेळी समजूतदारपणा दाखवून येणा-या समस्यांचा सामना करा.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)