Hot Sex Tips: सेक्स च्या बोअरिंग रुटीन ला करा Bye! पार्टनर सोबत बेडरूम मध्ये खेळून पहा 'हे' सेक्सी गेम्स
तुमच्या पार्टनरला सेक्ससाठी उत्तेजित करण्यासाठी बेडरूम मध्ये काही हॉट गेम्स खेळून तुम्ही तुमच्या सुंदर रात्रीची (किंवा ज्याही वेळी तुम्ही करत असाल) सुरुवात करू शकता.
Hot Sex Games: अनेकदा खूप वर्ष एकमेकांच्या सोबत असलेल्या कपलमध्ये सेक्स हे एक रुटीन बनणे अशी समस्या आढळते. तीच जागा, तीच पोझिशन आणि तेवढीच प्रोसेस यामुळे अनेकांचे सेक्स लाईफ बोअरिंग झालेले असते. त्यात तुम्हाला नावीन्य आणायचे असल्यास त्यासाठी एक भारी मार्ग आपण जाणून घेणार आहोत. हा मार्ग म्हणजे प्रत्यक्ष सेक्स नसला तरी फोरप्ले म्हणून वापरता येईल. तुम्हाला यात फक्त तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. तुमच्या पार्टनरला सेक्ससाठी उत्तेजित करण्यासाठी बेडरूम मध्ये काही हॉट गेम्स खेळून तुम्ही तुमच्या सुंदर रात्रीची (किंवा ज्याही वेळी तुम्ही करत असाल) सुरुवात करू शकता. हे गेम्स खेळून तुम्हाला तुमच्या पार्टनरची डर्टी बाजू समजून येईल. यामुळे एक वेगळा अनुभव घेता येऊ शकतो. यामध्ये तुमच्या कल्पनेच्या आधारे तुम्ही नियम ठरवलेत तरी चालतील मात्र एक बेसिक आयडिया जाऊन घेण्यासाठी हा लेख मदत करेल. चला तर मग..
बेडरूम मध्ये खेळ हे हॉट गेम्स
Roleplay
तुम्ही आणि तुमचा पार्टनर तुमच्या एखाद्या आवडत्या पात्राप्रमाणे ड्रेस घालून एका वेगळ्या परिस्थितीची कल्पना करून रोलप्ले करू शकता. यामध्ये नर्स आणि पेशंट हा रोल प्ले खूप फेमस आहे तुमची इच्छा असल्यास कम्फर्ट बघून एकदा नक्की ट्राय करा. अनेकांना आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तींबाबत आकर्षण असते या मार्गातून तुम्ही तसा अनुभव घेऊ शकता.
No Seeing
तुमच्या पार्टनरच्या डोळ्यावर पट्टी बांधून सेक्स करण्याचा विचार तुम्हीही कधी केलाय का? यात पार्टनरच्या शरीराबाबत तुम्हाला थोडी उत्सुकता वाढवण्याची संधी मिळते. यावेळी डोळे बांधले असताना डर्टी टॉक करून तुम्ही त्यांना उत्तेजित करू शकता.
Striptease
तुम्ही साधा कोणताही गेम घेऊन त्यात स्ट्रिपिंग ऍड करू शकता, स्ट्रिपिंग म्हणजे हळू हळू अंगावरील एक एक कपडा उतरवणे. मग समजा जर का तुम्ही सापशिडी खेळत असाल तर प्रत्येक वेळी सापाने पकडल्यावर त्या पार्टनरने एक कपडा उतरवायचा अशा पद्धतीने तुम्ही गेम खेळू शकता.
Truth & Dare
तुम्हाला हा गेम तर माहित असेलच, यामध्ये पार्टनरला जाणून घेण्यापासून ते आजवर पाहिले नसेल तसं पाहण्यापर्यंत सर्व संधी मिळतात त्यामुळे बाकी काही सुचलं नाहीच तर हा गेम मात्र आवश्य खेळा. हा गेम सेफ आणि इंटरेस्टिंग करण्यासाठी नुसता डेअर पर्याय घेऊन सुद्धा खेळता येईल.
Fantasies बॉक्स
एक बॉक्स मध्ये तुम्ही दोघांनीही आपापल्या सेक्श्युअल फॅंटसीज लिहून ठेवा. रोज सेक्स आधी या बॉक्स मधून एक चिट्ठी काढून तुम्ही त्यानुसार सेक्स करू शकता.
आजा नच ले
या गेममध्ये तुम्हाला म्युझिकवर केवळ तुमच्या जोडीदाराला नाचवयाचं नाहीये तर म्युझिक प्लेअरची कमांड पण तुम्हाला तुमच्या हातात ठेवायची आहे. तुम्ही न बघता गाणं स्टॉप करा आणि तुमच्या जोडीदाराला असेल त्या पोझिशनमध्ये स्टॅच्यू व्हायचं आहे. त्याच पोझिशनमध्ये तुम्ही त्यांना किस करून सेक्स साठी तयार करू शकता.
काय मग? वाट कसली पाहताय? शक्य असेल तर आजपासूनच हा प्रयोग करून पहा. तुमचे स्वतःचेही काही खास गेम असतील ते सुद्धा ट्राय करा.