Home Remedies to Improve Sex Power: सेक्स पॉवर वाढविण्यासाठी 'या' घरगुती उपायांची घ्या मदत

जाणून घ्या कोणते आहेत ते पदार्थ

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Max Pixel)

तुमची सेक्स ड्राइव (Sex Drive) निरोगी आणि तितकीच उत्साही राहण्यासाठी तुमची सेक्स पॉवर (Sex Power) वाढण्याची फार गरज आहे. त्यासाठी तुम्ही पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत तुम्ही रोज काय आहार घेता? रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम झालेला असतो. यामुळे तुम्हाला सेक्सचा (Sex) आनंद घेता येत नाही. परिणामी तुम्हाला Orgasm चा आनंद घेता येत नाही. म्हणून तुम्ही आहारात काही ठराविक गोष्टींचा समावेश केल्यास तुम्हाला आनंद घेता येईल.

पालेभाज्या, सुकामेवा यांसारख्या काही ठराविक गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश असल्यास त्याचा फायदा तुमची सेक्स पॉवर वाढविण्यासाठी होऊ शकतो. जाणून घ्या कोणते आहेत ते पदार्थ

1. खजूर

खजूर हे उष्ण असल्याने त्याचा शरीरास चांगला फायदा होतो. रोज एक खजूराचे सेवन केल्यास कामेच्छा वाढण्यास मदत होते आणि थकवा निघून जातो. त्यासाठी रोज 10 खजूर, 1 चमचा आलं, 1/8 चमचा वेलची, तूपाचा एक जार आणि चिमूटभर केसर घ्यायची. खजूर तूपाच्या जारमध्ये भिजवा आणि इतर सर्व साहित्य त्यात टाका. जार बंद करा आणि हा जार गरम ठिकाणी कमीत कमी 12 दिवसासाठी स्टोर करा.

2. हर्बल काढा

हा हर्बल काढा बनविण्यासाठी 1 भाग शतावरी, 1 भाग विदारी, 1/8 जायफळ आणि गरम दूध घ्या. 1 कप गरम दूधात या मिश्रणाचा एक चमचा टाका. त्यानंतर हे मिश्रण मिक्स करा. हा काढा दिवसातून दोनदा एकदा सकाळी आणि संध्याकाळी असा घ्या. या काढ्यामुळे सेक्स पॉवर वाढेल.

3. कांदा आणि लसूण

कांदा आणि लसूण कामोत्तेजक वाढविण्यासाठी खूप कामी येतो. यासाठी एक चमचा कांद्याच्या रसात एक चमचा आल्याचा रस मिक्स करा. हे मिश्रण रोज दिवसातून दोनदा प्या. मात्र हे सेवन तेव्हा घ्या जेव्हा तुमचे पोट कमीत कमी दोन तास खाली असेल. तुम्ही एक कप दूध, एक कप पाणी आणि कापलेले लसूणची कए पाकळी दूधात मिक्स करुन प्या. दूध आणि पाण्यात लसूण मिक्स करा आणि हळूहळू त्याला उकळवा. जोपर्यंत ते मिश्रण एक कप होत नाही. तोपर्यंत ते उकळवा.

हे मिश्रण पिऊन तुमची सेक्स पॉवर वाढविण्यासाठी मदत होते. हे मिश्रण त्यांनी प्यावे जे सेक्स ड्राइवने पीडित आहेत. याचा चांगला परिणाम मिळविण्यासाठी हे मिश्रण रात्रीच्या वेळी प्यावे.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.  म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)