Girlfriend-Boyfriend Running Away Tips: बॉयफ्रेंड सोबत पळून जाणाऱ्या मुलींसाठी मार्गदर्शक टीप्स
पळून जाण्याच्या कठोर निर्णयाची निवड करण्यापूर्वी तुम्हाला काय विचारात घेण्याची आणि करण्याची आवश्यकता आहे, त्याबाबत येथे काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. ज्याचा वापर तुम्ही टीप्स (Relationship Advice) म्हणूनही घेऊ शकता.
How to Run Away With Your Boyfriend: आपल्या प्रियकरासह पळून जाणे (Running Away) हा एक महत्त्वपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा निर्णय (Life Decisions) आहे. ज्यासाठी काळजीपूर्वक विचार आणि तयारी आवश्यक आहे. ही एक जीवन बदलणारी पायरी आहे. जी तुम्हा दोघांवर परिणाम करेल. इतकेच नव्हे तर तुमच्या दोघांच्याही कुटुंबीयांसाठी तो एक धक्का (Family Matters) असेल किंवा नव्याने निर्माण झालेले आव्हानही असेल. हे आव्हान व्यक्तीगत, सामाजिक अथवा नांतेसंबंधात दुरावा निर्माण करणारेही असू शकते. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे का याची अनेक वेळा वेगवेगळ्या पातळींवर खात्री करा. मगच तो निर्णय घ्या. शक्यतो, पळून जाण्याचा निर्णय न घेता कुटुंबीयांच्या मदतीने पुढचे पाऊल टाका. अगदीच शेवटचा पर्याय म्हणून त्याचा विचार करा. पळून जाण्याच्या कठोर निर्णयाची निवड करण्यापूर्वी तुम्हाला काय विचारात घेण्याची आणि करण्याची आवश्यकता आहे, त्याबाबत येथे काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. ज्याचा वापर तुम्ही टीप्स (Relationship Advice) म्हणूनही घेऊ शकता.
दीर्घकाळ कठोर विचार करा: तुम्ही पळून जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या कारणांवर विचार करा. जर तुम्ही तुमच्या तात्पुरत्या भावना किंवा संघर्षाला पर्याय म्हणून निर्णय घेत असाल तर, शांत होणे आणि पुनर्विचार करणे महत्त्वाचे आहे. पळून जाण्याचा परिणाम फक्त तुमच्यावरच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरही होतो. तुमच्या निर्णयावर तुमचा विश्वास असल्याची खात्री करा. शक्य असल्यास पालकांना याची कल्पना द्या. (हेही वाचा, प्रपोजला मिळालेला नकार कसा स्वीकाराल? लक्षात ठेवा! प्रेत्येकासाठी कोणीतरी थांबलेले असते)
पालकांशी संघर्ष: प्रेमसंबंधांना घरातून विरोध असेल तर, पालकांसोबत राहणे आव्हानात्मक असू शकते. विशेषत: मतभेद असताना. पण, संघर्ष करण्यापेक्षा गर्लफ्रेंड म्हणून बॉयफ्रेंड प्रति असलेले तुमचे महत्त्व त्यांना पटवून द्या. त्यांचे मन तुमच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करा. शक्य तितका संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करा. (हेही वाचा, Miracle of Love: पत्नीच्या प्रेमापोटी वनस्पतिजन्य अवस्थेतून परतला पती, 10 वर्षे होता कोमात)
बॉयफ्रेंडचा प्रभाव: जर तुमचा प्रियकर तुम्हाला सोडून जाण्यास उद्युक्त करत असेल, तर त्याचे मूल्यमापन करा. खऱ्या प्रेमासाठी तुम्ही तुमचे घर आणि स्थिरता अकाली सोडण्याची गरज नाही. रिलेशनशिपमधील गांभीर्याचा विचार करा. त्याच्या चांगुलपणाची परीक्षा घ्या. तो तुम्हाला धोका देणार नाही याची खात्री करा. तो धोका का देऊ शकत नाहीत याच्या कारणांची यादी करा. तो धोका का देऊ शकतो या कारणांची दुसरी यादी करा. दोन्ही यादीतील तफावत विचारात घेऊन निर्णय घ्या. केवळ तात्पूरत्या प्रभावाखाली निर्णय घेणे केव्हाही अडचणीचे ठरु शकते. (हेही वाचा, Friendship Marriage: प्रेम नाही, सेक्स नाही, जपानमध्ये होत आहेत अनोखे विवाह, जाणून घ्या काय आहे नवीन रिलेशनशिप ट्रेंड 'फ्रेंडशिप मॅरेज')
पर्यायांचा विचार: पळून जाणे हा एक कठोर उपाय आहे. तो निवडण्यापूर्वी इतर पर्यायांचा विचार करा. जसे की, दोघांच्याही कुटुंबाचा विचार घ्या. दोघांपैकी एकाच्याही कुटुंबात पाठिंबा असेल तर पाठिंबा असणाऱ्या जोडीदाराकडून समोरच्या कुटुंबाकडे विवाहासाठी मागणी घाला. ते शक्य नसेल तर मध्यस्थांकरवी बोलणी करुण पाहा. प्रेम हेच यावरचे उत्तर असू शकते.
संवाद आणि समुपदेशन: तुमच्या समस्यांबद्दल तुमच्या पालकांशी बोला. शांतपणे समस्यांचे निराकरण केल्याने तडजोड होऊ शकते. संवाद सुधारण्यासाठी आणि संघर्ष प्रभावीपणे सोडवण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन घेण्यास प्राधान्य द्या. अनेक जटीलातील जटील समस्या संवाद आणि समुपदेशाने सुटतात.
तुमच्या प्रियकराशी प्रामाणिक संभाषण करा: आपल्या प्रियकराशी खुले आणि प्रामाणिक संवाद आवश्यक आहे. पळून जाण्याची तुमची कारणे, संभाव्य आव्हाने आणि भविष्यातील उद्दिष्टांची चर्चा करा. तुम्ही आर्थिक जबाबदाऱ्या आणि अनपेक्षित समस्या एकत्र कसे हाताळाल याची योजना करा.
आर्थिक नियोजन: पळून जाणे हा एक भावनिक निर्णय असला तरी तो आव्हानात्मक आहे. या आव्हानांची जाणीव ठेवा. खास करुन उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांचा सामना कसा केला जाईल? याबाबत विचार करा. जोडीदाराकडे काही महिने आपल्या मुलभूत गरजा पूर्ण होतील येवढा आर्थिक निधी बँकेत शिल्लख आहे का? याबाबत विचार करा. जोडीदार नोकरी, व्यवसाय करतो का? याबाबत विचार करा. तो आगोदर नोकरी, व्यवसाय करत असेल तर उत्तम. खर्च कसे सामायिक केले जातील ते ठरवा. तुमच्यापैकी एकाची नोकरी गेली किंवा निधी संपला तर तुम्ही कसे व्यवस्थापित कराल याचा विचार करा.
बांधिलकी आणि जबाबदारी: तुम्ही दोघांनीही एकत्र जीवन यशस्वीपणे सुरू करण्यासाठी वचनबद्ध, जबाबदार आणि प्रेरित असणे आवश्यक आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, विश्वासू प्रौढ किंवा व्यावसायिकांकडून सल्ला घ्या. नातेवाईक, शिक्षक, शाळा सल्लागार किंवा मित्राच्या पालकांचा सल्ला घ्या.
नॅशनल रनअवे सेफलाइन: तुमच्याशी बोलण्यासाठी कोणीही नसल्यास, समर्थन आणि मार्गदर्शनासाठी 1-800-RUNAWAY वर कॉल करा.
रोजगार, नोकरी शोधा: स्वतःला आर्थिक आधार देण्यासाठी तुम्हाला स्थिर नोकरी, व्यवसायाची आवश्यकता असेल. त्यासाठी पळून जाण्याआगोदरच रोजगाराची आगाऊ संधी शोधा. त्यासाठी Craigslist, Monster, Indeed, आणि SimplyHired सारख्या जॉब साइट्स वापरा. तुम्ही अजूनही शाळेत असल्यास, वर्गानंतर आणि आठवड्याच्या शेवटी काम करण्याची योजना करा.
सुरक्षित गृहनिर्माण: राहण्यासाठी जागा शोधणे महत्वाचे आहे. राहण्याची किंमत बदलते. म्हणून तुमच्या बजेटमध्ये (परवडेल असे) एक स्थान निवडा. तुमच्या एकत्रित मासिक उत्पन्नाच्या सुमारे 30% भाड्यावर खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवा. आत जाण्यापूर्वी ठेवीसाठी बचत करा. परवडणाऱ्या अपार्टमेंट किंवा घरांसाठी ऑनलाइन शोध घ्या.
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून तुमचा परस्परांवर कितीही विश्वास असला तरी, आर्थिक स्थिरता, सुरक्षा आणि आव्हानांचा सामना करण्याची क्षमता असल्याशिवाय पळून जाण्याचा अजिबात विचार करु नका. आगोदर स्वत:मध्ये तेवढी ताकद निर्माण करा, कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्याची आणि संकटावर मात करुन उभा राहण्याची तयारी ठेवा. ती ठेवता येत असेल तरच पुढचा निर्णय घ्या.