सेक्स लाइफ उत्तम ठेवायची असेल तर कपल्सने 'या' गोष्टींवर अधिक भर द्यावी

तर रिलेशनशिप एक्सपर्ट्सचे असे म्हणणे आहे की, नात्यात प्रेम आणि विश्वासाव्यतिरिक्त काही गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Dangerr)

कोणत्याही यशस्वी वैवाहिक आयुष्यामागे फक्त प्रेम हेच कारण नसते. तर रिलेशनशिप एक्सपर्ट्सचे असे म्हणणे आहे की, नात्यात प्रेम आणि विश्वासाव्यतिरिक्त काही गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. वैवाहिक आयुष्य उत्तम बनवण्यासाठी सेक्ससह पार्टनरचे आभार सुद्धा व्यक्त करणे फार गरजेचे आहे. सोशल सायकोलॉजिकल अॅन्ड पर्सनालिटी सायन्स जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, बहुतांश जे लोक आपल्या पार्टनरचे आभार मानणे विसरत नाहीत त्यांची सेक्स लाइफ उत्तम असते.(Foreplay Tips From Kamasutra: आपल्या लैंगिक आयुष्यात स्पाइस आणण्यासाठी 'या' कामसूत्र फोरप्ले टिप्स फॉलो करा)

मॅरिड लाइफमध्ये सेक्स ही मुख्य भुमिका बजावते. पण एक्सपर्ट्स यांचे असे म्हणणे आहे की, सेक्सशिवाय कपल्समधील नाते अधिक मजबूत होऊ शकत नाही. त्यामुळे नात्यात एक उदासीनता दिसून येते. तसेच नात्यात फक्त सेक्समुळेच एकमेकांच्या जवळ येतो असे नाही आहे. पण जे लोक आपल्या पार्टरनच्या भावनात्मक गरजा सुद्धा पूर्ण करतात त्यांची सुद्धा सेक्स लाइफ सफल होते. तर जे लोक आपल्या पार्टनर सोबत शारिरीक आणि मानसिक दोन्ही स्तरावर काळजी घेतात त्यांना सेक्सवेळी पार्टरकडून तेवढाच आनंद मिळतो.

ज्या कपल्समध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर व्यक्त केला जातो त्यांचे नाते अधिक काळ टिकून राहते. याच कारणामुळे असे कपल्स नेहमीच एकमेकांना आकर्षित करतात. इंडियाना युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून असे समोर आले की, कोरोना आणि लॉकडाउनच्या कारणामुळे सेक्स लाइफमध्ये मजा करण्याची काहींची इच्छा होत नाही. लोकांचे सेक्शुअल वागणे बदलले गेले आहे. अशातच सेक्स लाइफ उत्तम बनवण्यासाठी लहान-लहान गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.(Sex Tips: तुमच्या सेक्स लाइफ ला बूस्ट करण्यासाठी 'या' खाद्य पदार्थांचे सेवन करा)

कपल्सने वेळातवेळ काढून बाहेर जाणे, एकमेकांना गिफ्ट देणे, प्रेम आणि पार्टनरच्या भावनांचा सुद्धा आदर करणे या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुमचा पार्टनर ज्या काही चांगल्या गोष्टी  करत असेल  त्याला प्रोत्साहन देण्यास विसरु नका. ऐवढेच नाहीतर तुम्हाला पार्टनरची एखादी गोष्ट खटकत असेल तर ती सुद्धा तुम्ही खुल्या मनाने त्याच्या समोर व्यक्त करा. यामुळे एकमेकांमध्ये भांडण होणे हे दूरच राहिल.