Content Writing: Work From Home असताना Sex या विषयावर लिहिताय, पाहताय? अवघडलेपण येत असेल तर काय कराल?

नसावे. तो त्यांच्या कामाचा भाग आणि गरज असते. त्यामुळे शक्यतो तशी मानसिकता ठेऊनच कोणताही विषय लिखाण करण्यास घ्या.

Content Writing On Sex Topic Condom | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

सेक्स (Sex) ही तशी सर्वासामान्य बाब. अपवाद वळता जगभरातील प्रत्येक प्राणी, नर-मादी करतच असतात. प्रामुख्याने मनुष्य प्राण्याला जगभरातील सर्व प्राण्यांमध्ये सेक्स या प्रकारात विशेष रस. त्यामुळेच बहुदा जगभरात लैंगिक विषय (Sex Topic) म्हणजेच सेक्सवर सर्वाधिक साहित्य प्रकाशित होते. पुस्तके, मासिके यांच्या माध्यमातून लिहिले, वाचले बोलले आणि पाहिले जाते. हा विषय सर्वसामान्य असला तरी या विषयाबाबत समाजात 'टॅब्यू' असतो. त्यामुळे या विषयावर सर्वांसमोर थेट लिहिले, बोलले, पाहिले जात नाही. अशा वेळी खरी गोची होते सेक्स या विषयावर आशय लिहिणाऱ्यांची म्हणजेच Content Writer या प्राण्याची. सध्या कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन आहे. अशा वेळी अनेक कंपन्या Work From Home संकल्पनेला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ऑनलाईन कंटेंट देणाऱ्या अनेक कंपन्यांचे Content Writing कर्मचारी घरुनच करतात. अशा वेळी सेक्स या विषयावर लिहिताना एक प्रकारचे अवघडलेपण येते.

नेमकी समस्या काय?

सेक्स हा विषय सर्वपरिचीत आणि गरजेचा असला तरी अद्याप तरी तो सर्वमान्य नाही. त्यामुळे पुढारलेल्या मंडळींचा, कुटुंबांचा अपवाद वगळता अद्यापही या विषयावर थेटपणा टाळलाच जातो. अशात घरी काम करत असताना जर खासगीपणा नसेल म्हणजे प्रायव्हसी नसेल. तर, Content Writer ला सर्व प्रकारचे लिखाण सर्वांसमोरच करावे लागते. अशा वेळी लिखाणाचा विषय हा जर सेक्स असेल तर आजूबाजूच्या मंडळींच्या भूवया केवळ उंचावतच नाहीत तर वर छप्पराला टेकतात. त्यातही Content Writer हा जर ग्रामीण भागातला असेल तर ही व्यक्ती असले भलतेसलते काय लिहिते, पाहते. हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून संबंधित व्यक्तीविषयी गैरसमजही निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी काय तोडगा काढाल?

थेट बोलून घ्या!

गैरसमज होण्यापेक्षा थेट बोलून घेणे केव्हाही चांगले. अनेकदा आपण लॅपटॉप, पीसी, मोबाईलवर दिसणारे फोटो पाहून घरातील मंडळींचे डोळे विस्फारले जातात. घरात लहाण मुलेही असतात. अशा वेळी थेट बोलणे टाळले जात असले तरी नाराजी स्पष्ट दिसते. त्यामुळे आपणच मोकळेपणा दाखवत घरातील ज्येष्ठ आणि समवयस्क मंडळींशी बोलून घ्या. त्यांना आपले काम, कामाची जबाबदारी आणि त्याची गरज थोडक्यात समजून सांगा. तसा प्रयत्न करा. (हेही वाचा, वारंवार Sex केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते का? जाणून घ्या सविस्तर)

शक्यतो वेळेबाबत दक्ष राहा

सायंकाळी अथवा रात्री प्राईम टाईम या कालावधीत घरातील सगळे लोक एकत्र असतात. त्यात लॉकडाऊन असल्याने घरातून कोणी बाहेर पडेल तर शपथ. त्यामुळे शक्यतो सेक्स या विषयावर लिहिताना, वाचताना, पाहता हा वळ टाळा. या विषयी लिहिताना शक्यतो दुपारी किंवा रात्री घरातील लोक, लहान मुले झोपली असतील असा वेळ या लिखाणासाठी निवडा. (हेही वाचा, Lockdown: कंडोम घ्या मगच Quarantine सेंटरमधून घरी जा; बिहारमधल्या आरोग्य विभागाचा उपक्रम)

एखादा व्यक्ती सोबत घ्या

Content Writer जर विवाहीत असेल तर त्याने आपल्या जोडीदाराला असे लिखाण करताना सोबत ठेवणे उत्तम. म्हणजे अशा वेळी शक्यतो कोणी फार गांभीर्याने पाहात नाही. तसेच सोबतचा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस बोलण्यात गुंतवू शकतो. Content Writer जर विवाहीत नसेल तर समवयस्क व्यक्ती (ज्याच्याशी आपण मनमोकळे बोलू शकतो) सोबत असताना किंवा त्याच्यासमोर आपण हे लिखाण करु शकता. (हेही वाचा, Big One Dating: केवळ मोठे लिंग असणारे पुरुष भेटतील असे सांगणाऱ्या 'या' डेटिंग साईट वर एका आठवड्यात 400 महिलांचे रजिस्ट्रेशन, वाचा सविस्तर)

फोटो, व्हिडिओ पाहणे शक्यतो टाळा

एक चित्र हजारो शब्दांचे काम करते असे म्हणतात. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे व्हिडिओ. त्यामुळे फोटो, व्हिडिओ पटकन नजरेत भरतात. त्यामुळे शक्यतो फोटो, व्हिडिओ घरात पाहणे टाळा. अगदीच गरज असेल तर नेमकेपणाने सर्च करा आणि त्याचा पटकन वापर करुन ते पेज बंद करा. (हेही वाचा, Lockdown: अरे बापरे...! क्वारंटाईन असलेल्या नवऱ्याची बायको प्रियकरासोबत पळाली)

डॉक्टर, वकील आणि पत्रकार (लेखक) या मंडळींना जगातील कोणत्याच विषयाचे वावडे नसते. नसावे. तो त्यांच्या कामाचा भाग आणि गरज असते. त्यामुळे शक्यतो तशी मानसिकता ठेऊनच कोणताही विषय लिखाण करण्यास घ्या. त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. असे लिखाण करताना लहान मुले सोबत असणार नाहीत याची काळजी घ्या. चांगल्या हेतूने आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले कोणतेही काम वाईट नसते. मात्र, आपल्या कामामुळे आपल्याला किती समाधान मिळते, आपल्या वर्तुळातील लोकांवर काय परिणाम होतो. आपल्या कामातून आपण समाजाला काय देतो हे फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे कोणतेही लिखाण करताना त्याचे तारतम्य बाळगणे महत्त्वाचे.