Condom Mistakes: कंडोम घालताना पुरुषांकडून होतात चुका; जाणून घ्या गर्भधारणा टाळण्यासाठी कसा वापरावा निरोध

कारण कंडोम ही सेक्सदरम्यानची फार महत्वाची गोष्ट आहे, त्याला तितकेच गंभीरपणे घेणे गरजेचे आहे.

Condom (Photo Credits: Pixabay)

कंडोम (Condom) घालणे हे कदाचित तुम्हाला अतिशय सोपे वाटत असेल. कंडोम घेतले ते लिंगावर ठेऊन खाली ओढले की झाले काम, बरोबर? पण असे नाही. कंडोम घालायची एक पद्धत आहे, ती पाळली नाही तर कंडोम घालताना तुमच्याकडून अनेक चुका घडत असतील. या चुकांमुळे अवांछित गर्भधारणा आणि एसटीआय होण्याचा धोका संभवतो. सेक्सदरम्यान विर्य बाहेर येण्याआधीच तुम्ही कंडोम काढता? किंवा एकदा काढलेले कंडोम पुन्हा घालण्याचा प्रयत्न करता? तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण कंडोम ही सेक्सदरम्यानची फार महत्वाची गोष्ट आहे, त्याला तितकेच गंभीरपणे घेणे गरजेचे आहे.

> कंडोम विकत घेण्यापूर्वी त्याची कालबाह्यता तारीख तपासा. तसेच कंडोम नेहमी चांगल्या क्वालिटीचे विकत घ्या, त्यामुळे लैंगिक आजार पसरण्याचा धोका कमी असतो.

> कंडोमचे पॅकेट दाताने किंवा कोणत्याही धारधार वस्तूने उघडू नये. असे केल्याने कंडोम फाटण्याची शक्यता वाढते.

> बरेचवेळा सेक्सदरम्यान घाईत कंडोम घेऊन तो केवळ शिश्नाच्या काही इंचांपर्यंतच घातला जातो. मात्र असे करणे चुकीचे आहे. कंडोम पूर्णतः घालणे गरजेचे आहे.

> कंडोम घालताना त्याचे टोक चिमटीत पकडून ठेवा आणि उरलेला कंडोम खाली सरकवत या. चिमटीत पकडलेल्या कंडोमच्या टोकाच्या आता हवा राहणार नाही याची काळजी घ्या.

> जननेंद्रियाच्या खालच्या भागाकडे हळूहळू निरोध घेऊन सरकवत असताना, तो खाली सरकत नसल्यास, तुम्ही चुकीच्या पद्धतीने पकडत आहात आणि त्याला टाकून द्यायची गरज असते. अशा वेळेस, नवीन निरोध वापरा. (हेही वाचा: Saliva as Lube: ...म्हणून सेक्सदरम्यान पॉर्न स्टार्सप्रमाणे थुंकीचा वापर करणे टाळा; नाहीतर Private Part बनेल अनेक आजारांचे घर)

> जर आपण चुकून कंडोम उलटा परिधान केला असेल तर तो पुन्हा काढून सरळ घालू नका. कारण यामुळे कंडोमला शुक्राणू लागू शकतात आणि त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढेल.

> पुरुष कंडोम किंवा महिला कंडोमपैकी फक्त एकच कंडोम एकावेळी वापरा. दोन्ही प्रकारचे कंडोम एकाच वेळी वापरू नका.

> शिश्नाची ताठरता असेपर्यंतच कंडोम काढावा, नाहीतर तो स्त्रीच्या योनीमार्गात अडकण्याची शक्यता आहे.

कंडोम किंवा निरोध हा खूप प्रभावी गर्भनिरोधक पदार्थ आहेत. योग्यरित्या वापरल्यास ते गर्भधारणांविरुद्ध 98% प्रभावी आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने वापरल्यास गर्भधारणासह इतर अनेक आजारही पसरू शकतात. त्यामुळे कंडोम वापरताना योग्य ती काळजी जरुरू घ्या.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif