सेक्समुळे होणाऱ्या वेदना टाळण्यासठी Amarantha Robinson या मॉडेलने तीन वर्षांपासून टाळले शरीरसंबंध
आता माझ्यासोबत जो कोणी असतो ते केवळ माझ्यासाठीच असतो. आणि पूर्णपणे माझा असतो. मी शरीरसंबंध ठेवणे बंद केले आहे. याच काळात मी चर्चमध्येही जाणे सुरु केले. तिथे माझ्या विश्वासाला अधिक मजबूती मिळाली. मला समजत गेले की सेक्स ही एक वाईट गोष्ट आहे. सेक्समुळे केवळ वेदनाच मिळतात.
सेक्स (Sex) हा दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक. मात्र कधी कधी गोष्टी अशा बदलतात की आयुष्यालाच नवे वळण मिळते. ऑस्ट्रलियाती एक प्रसिद्ध मॉडेल अमरंथा रॉबिन्सन (Amarantha Robinson) हिच्या आयुष्यातही असेच काहीसे घडले आहे. ज्यामुळे तिने पाठिमागील तीन वर्षांपासून SEX (शरीरसंबंध) केला नाही. होय, एका वृत्तपत्राला अमरंथा रॉबिन्सन हिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तीने हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत तिने सेक्स पासून दुरावा ठेवण्याचे कारण सांगितले आहे. शिवाय तिने सेक्स केल्यामुळ तिला काय काय त्रास भोगावा लागला याबाबत ही सांगितले आहे.
अमरंथा रॉबिन्सन (Amarantha Robinson) हिने 'द गार्डियन' नावाच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 2016 मध्ये मी 30 वर्षांची होते. तेव्हा मी डेट करत होती. परंतू, माझी डेटींग खूपच खराब चालली होती. माझ्या आयुष्याचा एक साचा तयार झाला होता. मी ज्याही कोणत्या एखाद्या पुरुषाला भेटत असे तो मला आवडत असायचा. त्यामुळे सहाजिकच आमच्यात शरीरसंबंध होत होते. मात्र, त्यानंतर लवकरच आमची रिलेशनशिप संपत असे. शेवटी मला असे वाटत होते की, पुरुष केवळ सेक्ससाठी माझ्याकडे येतात. जेव्हा त्यांचे मन भरते तेव्हा ते माझ्यापासून दूर होतात. (हेही वाचा, Gold Face Treatment Video: जगप्रसिद्ध मॉडेल बेला हदीद हिने केली 24K शुद्ध सोन्याने गोल्ड फेस ट्रीटमेंट; पाहा किती आला खर्च?)
अमरंथा रॉबिन्सन (Amarantha Robinson) पुढे सांगते की, खूप विचार केल्यावर मी निर्णय घेतला की, आयुष्यातून सेक्सलाच काढून टाकूया. त्यामुळे मी सेक्स करणेच बंद केले. आता माझ्यासोबत जो कोणी असतो ते केवळ माझ्यासाठीच असतो. आणि पूर्णपणे माझा असतो. मी शरीरसंबंध ठेवणे बंद केले आहे. याच काळात मी चर्चमध्येही जाणे सुरु केले. तिथे माझ्या विश्वासाला अधिक मजबूती मिळाली. मला समजत गेले की सेक्स ही एक वाईट गोष्ट आहे. सेक्समुळे केवळ वेदनाच मिळतात. (हेही वाचा, Model Nikita Gokhale Hot Photo: मॉडेल निकिता गोखले हिने 'शांतता म्हणजे महान सामर्थ्याचा स्रोत' ही पंचलाईन वापरत शेअर केला न्यूड फोटो)
अमरंथा रॉबिन्सन पुढे सांगते की, सेक्सशिवायची माझी दोन वर्षे खूपच चांगली गेली. डेटींग लाईफमध्ये मानसीक वेदना सांभाळणे ही माझ्यासाठी एक संधी होती. मी खूश राहू लागली. तसे, चर्चमधील सिद्धांतावर वाटचाल करु लागली. भावनात्कमक रुपात मी स्थीर होती. परंतू, त्याचा माझ्या काही गोष्टींवर मोठा परिणाम होऊ लागला. कोणत्याही परिस्थीतीत मी स्वत:च्या दिशेने काम करु लागली होती. मला जाणवू लागले की, सेक्स न केल्याने मी अधिक उर्जा प्राप्त करु शकत होती. जी उर्जा मी माझ्या इतर कामात वापरु शकते. तीसऱ्या वर्षात मला माझी डेटींग लाईफ अगदीच वाईट वाटू लागली.
मला वाटत होते की माझ्या आयुष्यात काहीच उरले नाही. हे केवळ सेक्सशी संबंधीत नव्हते. मी छोट्या छोट्या गोष्टी हरवत चालले होते. जसे की फ्लर्ट करताना कोणत्याही पुरुषासाठी खास ठरणे. असे वाटत होते की मी आयुष्य जगणेच विसरले आहे. मी माझ्यातच हरवत चालले आहे. हळूहळू मी शरीर आणि सेक्शुअलिटीपासून दूर होत होते. चर्चमध्ये जाण्याची माझी इच्छाही संपत चालली होती. शेवटी मी स्वत:ला आणखी एक संधी देण्याचा विचार केला. मी आयलँडच्या एका पुरुषाला ऑनलाईन भेटले आणि आणि ट्रीपला जाण्याचा विचार केला.