MS Dhoni याच्या विंटेज गाड्यांच्या संग्रहात Ford Mustang कारचा झाला समावेश, जाणून घ्या किमतीपासून सर्वकाही

भारतीय संघाचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून तसेच श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. क्रिकेट बरोबरच धोनीला वाहनांचीही आवड आहे. नुकतंच धोनीच्या कार कलेक्शनमध्ये नवीन आणि विंटेज गाडीने स्थान मिळवले आहे. धोनीने अलीकडेच Ford ची 1970 मॉडलची Mustang गाडी खरेदी केली आहे.

एमएस धोनी कार कलेक्शन (Photo Credit: Facebook)

MS Dhoni Car Collection: भारतीय संघाचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीने (MS Dhoni) काल, 7 जुलै रोजी चाळीशीत पदार्पण केलं. जुलै महिना सुरु होताच चाहत्यांना माहीच्या वाढदिवसाचे वेध लागते. धोनी जगातील सर्वाधिक प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनी आयसीसीच्या तीनही मानाच्या ट्रॉफी जिंकणारा एकमात्र क्रिकेटर आहे. धोनी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून तसेच श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. क्रिकेट बरोबरच धोनीला वाहनांचीही आवड आहे. त्याच्या गॅरेजमध्ये जगातील सर्वात महागड्या आणि विंटेज बाईक पासून गाड्यांचा आकर्षक संग्रह आहे. नुकतंच धोनीच्या कार कलेक्शनमध्ये (MS Dhoni Car Collection) नवीन आणि विंटेज गाडीने स्थान मिळवले आहे. धोनीने अलीकडेच Ford ची 1969 मॉडलची Mustang गाडी खरेदी केली आहे. (MS Dhoni-Sakshi Wedding Anniversary: लग्नाच्या 11व्या वाढदिवशी धोनीने पत्नी साक्षीला दिली व्हिंटेज भेट, पाहा Photo)

फोर्डने नुकतंच त्यांच्या मस्टंग कारची भारतात लाँच केली असून धोनी 1970 मॉडेलचा मालक झाला आहे, ज्याचे हेडलाइट्स सुधारित रूप देण्यात आले आहे आणि 1969 मॉडेलनुसार पुनर्संचयित केले गेले आहेत. फोर्डची मस्टंग ही जगातील सर्वात लोकप्रिय कार मानली जाते ज्याची भारतात किंमत सुमारे 75 लाख रुपये आहे. धोनीच्या मस्टंग कारमध्ये 1992 च्या मॉडेलचे इंजिन वापरण्यात आले आहे. इंजिनसह, या कारचे निलंबन आणि ब्रेक देखील अपग्रेड केले गेले आहेत. कारला पूर्णपणे नवीन डिझाइन केले गेले आहे आणि या गाडीचा अंतर्गत भाग इटालियन लेदरपासून सुसज्जित केला गेला आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaffar Khan DG Luxury Cars (@gaffarkhan_007)

धोनीच्या वाहनांच्या सुपर कलेक्शनमध्ये अडीच कोटी रुपयांच्या गाडीपासून 30 लाख रुपयांच्या दुचाकीचा समावेश आहे. धोनीकडे ग्रँड पोर्च 911 कार असून त्याची किंमत तब्बल 2.50 कोटी रुपये आहे. या व्यतिरिक्त धोनीच्या गॅरेजमध्ये Ferrari 599 GTO गाडी देखील आहे. या गाडीची किंमत 1.39 कोटी रुपये इतकी आहे. तसेच धोनी बाईकचा देखील शौकीन आहे. धोनीकडे एक Confederate Hellcat X32 दुचाकी आहे, जी जगातील सर्वात महागड्या बाइकपैकी एक आहे. ज्याची किंमत सुमारे 30 लाख रुपये आहे. धोनीच्या गॅरेजमध्ये नवीन कार तसेच व्हिंटेज गाड्यांचा देखील चांगला संग्रह आहे. नुकतंच धोनीने 11व्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नी साक्षीला एक व्हिंटेज कार भेट म्हणून दिली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now