Monsoon Tips: पावसाळ्यात कपडे झटपट सुकवण्यासाठी वापरा या घरगुती ट्रिक्स, वाचा सविस्तर
येत्या चार महिन्यात या टिप्स तुम्हाला बऱ्याच कायम येऊ शकतात.
Monsoon Home Care Tips: मुंबई (Mumbai) सह महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्री- मान्सूनचं आगमन अगोदरच झालं आहे. पुढील चार महिन्यांचा हा मान्सून उत्सव येत्या दिवसात सुरु होईल असा अंदाज आहे. पावसाळा म्हंटल की ओले चिंब होऊन मजामस्ती करणे हे आलेच. कितीही काहीही म्हंटल तरी पावसात भिजण्याचा मोह लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही आवरता येत नाही, पण भिजल्यानांतर पुढे समस्यां येतात त्यांचं काय करायचं? पावसाळा सुरु झाला की कोणत्याही गृहिणीला विचारा आजारां इतकीच पावसाळयात कपडे कसे सुकणार ही मुख्य समस्या त्यांना पीडत असते. कधीतरी उन पडते मात्र तेवढ्या वेळात कपडे सुकतीलच याची काही शाश्वती नसते, घरात कपडे वाळत घालावेत तर त्यामुळे दमट वातावरण निर्माण होते. अशावेळी कपडे झटपट सुकण्यासाठी आणि घरात वातावरण फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे याच्या काही सोप्प्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. येत्या चार महिन्यात या टिप्स तुम्हाला बऱ्याच कायम येऊ शकतात. Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रातील विदर्भात आणि मध्य प्रदेशातील काही भागात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा-IMD
पावसाळयात कपडे लवकर सुकावेत यासाठी काय कराल?
- मुख्य म्हणजे कपडे योग्य पद्धतीने पिळून घ्यावेत. मशीन वापरात असाल तर उत्तम.
- कपडे थंड पाण्याने धुण्याऐवजी किंचित कोमट किंवा गरम पाण्याने धुवावेत. अगदीच शक्य नसल्यास कपडे धुवून झाल्यावर गरम पाण्यातून काढावेत.
- कपडे वेळात घालताना त्यामध्ये पुरेसे अंतर ठेवा.
- शक्यतो शर्ट किंवा टीशर्ट वेळात घालण्यासाठी हँगरचा वापर करा.
-घरात कपडे वेळात घालत असाल तर त्याभोवती एक अगरबत्ती पेटवून ठेवा. (कपड्यांपासून दूर ठेवा) यामुळे कपड्यांना कुजट वास सुद्धा येत नाही.
- कपडे 90 टक्के सुकल्यावर घडी करून ठेवण्याआधी इस्त्री करू शकता. पण अगदी ओल्या कपड्यांना इस्त्री करू नका यामुळे शॉक लागू शकतो.
- कपड्यांना पावसाळ्यात येणारा दुर्गंध घालवण्यासाठी कपडे धुताना त्या पाण्यात थोडं व्हिनेगर घाला.
-ज्या खोलीत कपडे वाळायला घातले असतील तिथे एका पिशवीत मीठ भरून ठेवा. कपड्यातील ओलावा मीठ शोषून घेते.
पावसाळ्यात कपड्यांची निवड करताना सिल्क किंवा नायलॉन ला प्राधान्य द्या, हे फॅब्रिक चटकन सूकते. कॉटनचे कपडे घालणे शक्यतो टाळा. पावसाळ्याच्या आधी अंतर्वस्त्र थोडी अधिक प्रमाणात खरेदी करून ठेवा, अगदी किंचित ओले कपडे घालूनही त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या! हॅप्पी मान्सून!