Men’s Lifestyle: उन्हाळ्यात पुरुषांच्या त्वचेबाबतीत उद्भवतात या समस्या; उजळपणा टिकवून ठेवण्यासाठी करा हे उपाय

घरातून बाहेर पडणेही मुश्कील ठरत आहे. अशात सूर्याच्या कडक किरणांचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर (Skin). आजकाल स्त्रियांप्रमाणे पुरुषही आपल्या स्किनकडे विशेष लक्ष देत आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

Mens Summer Skin Problems: सध्या संपूर्ण देशात उष्णतेची लाट पसरली आहे. राज्यात अजून 4 दिवस तापमान जास्तच राहणार आहे. उष्णतेचा आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, घरातून बाहेर पडणेही मुश्कील ठरत आहे. अशात सूर्याच्या कडक किरणांचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर (Skin). आजकाल स्त्रियांप्रमाणे पुरुषही आपल्या स्किनकडे विशेष लक्ष देत आहेत. मात्र पुरुषांची त्वचा ही थोडी निगर असल्याने ती मेंटेन करने अवघड ठरते, त्यात उन्हाळ्यात तर त्रास वाढतोच. उन्हाळ्यात प्रामुख्याने त्वचेच्या 5 समस्या उद्भवतात, त्यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर तुमची त्वचा बिघडण्यास वेळ लागणार नाही.

पिंपल (Pimples) – उन्हाळ्यातील सर्वात कॉमन स्किन प्रॉब्लेम म्हणजे पिंपल. उन्हाळ्यात घाम जास्त येतो त्यामुळे त्वचा तेलकट होते, परिणामी पिंपलचे आगमन. यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे एक्स्ट्रा घामाला रोकणे. घाम आल्यानंतर आपण तो रुमालाने घासून कोरडा करतो मात्र ते चुकीचे आहे. चेहरा चेलकट झाल्यावर टिश्यू पेपरने पुसण्याऐवजी टॅप करा. घराबाहेत पडण्यापूर्वी आणि घरी आल्यावर फेशवॉशने चेहरा साफ करून अँटीफंगल पावडर (Antifungal Powder) चा वापर करा.

सनबर्न (Sunburn) –  उन्हाळ्यात घरातून बाहेर पडल्यावर अचानक त्वेचेची अग होऊ लागते, यासाठी शक्यतो थंड पाण्यात मीठ घालून अंघोळ करा. घराबाहेर पडण्यापूर्वी नेहमी मॉइस्चरायझर लावूनच बाहेर पडा. मॉइस्चरायझर विकत घेताना त्यावरील SPF नंबर नक्की चेक करा.

तेलकट त्वचा (Oily Skin) – उन्हाळ्यातील अजून एक महत्वाची समस्या म्हणजे तेलकट त्वचा. उन्हाळ्यात आपली त्वचा ऑईल फ्री राहणे गरजेचे आहे. यसाठी फेस वॉश लावल्यानंतर एक चांगला टोनर आणि ऑईल कंट्रोल क्रीमचा चा वापर करा. आठवड्यातून दोन वेळा मुलतानी मिट्टी फेसपॅक आणि दोन वेळा चेहरा व्यवस्थित स्क्रब करा. काही खास गोष्टीसाठी बाहेर पडत असाल तर ‘पील ऑफ मास्क’ चा नक्कीच फायदा होईल. (हेही वाचा: Beard Is New Hot: प्रत्येक भारतीय पुरुषाने ट्राय केलेच पाहिजेत दाढीचे हे प्रकार)

घामाचा दुर्घंध (Body Odor) – यासाठी अंघोळ केल्यावर शरीरावर माईल्ड पावडरचा फवारा मारा, यामुळे तुमच्या कपड्यांना घामाचा वास येणार नाही. त्यानंतर काखेत 24x7 रोल ऑन न चकता लावा आणि शेवटी आवडते परफ्युम लावा.

त्वचेचे काळवंडने (Sun Tanning) – उन्हाळ्यात अनेकांच्या बाबतीत टॅनींग ची समस्या उद्भवते. यासाठी अगदी उठल्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य फेस वॉश, टोनर आणि त्यानंतर मॉइस्चरायझर किंवा सनस्क्रीन लावा. बाहेरून आपल्यावर चेहरा स्वच्च धुण्याची स्वया लावलं. त्वचा जास्तच काळी होत असेल तर डी टॅन पॅक (D Tan Pack) चा वापर करा. नियमित चारकोल मास्कचा वापरही अतिशय फायद्याचा ठरतो.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now