Men’s Lifestyle: एखाद्या अभिनेत्याप्रमाणे हेअरस्टाईल हवी आहे? केसांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या टिप्स

मात्र यासाठी केसांची काळजीही तशीच घेणे आवश्यक आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

Men’s Lifestyle Hair Routine: केस, आपल्या व्यक्तिमत्वाच्या सौंदर्यामधील एक अविभाज्य घटक. सध्या केसांच्या इतक्या हेअरस्टाईल ट्रेंडीगमध्ये आहेत की नक्की काय ट्राय करावे हे समजत नाही. मात्र या प्रत्येक हेअरस्टाईल ट्राय करण्याआधी आपले केस त्या लायक आहेत का नाही हे तपासून घेणे आवश्यक आहे. केस दाट, मुलायम, व्यवस्थित वाढ झाले असतील तर कोणतीही हेअरस्टाईल तुमच्या चेहऱ्यावर सूट होऊ शकते. मात्र यासाठी केसांची काळजीही तशीच घेणे आवश्यक आहे. सध्या केस गळणे, कोंडा होणे आणि अकाली पांढरे होणे अशा तीन समस्या पाहायला मिळतात. तसेच केसांचे अनेक प्रकार असतात, जसे नॉर्मल केस (Normal hair), ड्राय केस (Dry hair), ऑईली केस (Oily hair) आणि ग्रेसी केस (Greasy hair). तर आपली नेमकी समस्या काय आहे आणि आपल्या केसांचा प्रकार काय आहे हे ओळखून उपाययोजना करा, तशीच उत्पादने वापरा आणि बघा काही दिवसांत तुमचे केस कोणत्याही हेअरस्टाईलसाठी तयार होतील. यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा.

शाम्पू - केसांची काळजी घेताना सर्वात महत्वाचे आहे ते आपल्या केसांसाठी योग्य असा शाम्पू निवडणे. तुमच्या केसांच्या नक्की काय समस्या आहेत जसे की कोंडा, केस तुटणे, केस गळणे, केस फार कोरडे असणे हे जाणून घेऊन त्यानुसार शाम्पूची निवड करा. मात्र दररोज शाम्पू करणे टाळा, आठवड्यातून तीन दिवस शाम्पू आणि कंडिशनर, तर दोन दिवस केसातील कोंडा दूर होण्यासाठी वेगळा थोडा स्ट्रॉंंग शाम्पू असे रुटीन असू द्या.

कंडिशनर – बरेच लोक कंडिशनरला फार महत्व देत नाहीत, मात्र लक्षात ठेवा शाम्पूनंतर केस मऊ होण्यासाठी कंडिशनरचा वापर करणे फार गरजेचे आहे. शाम्पू केसांची मुलायमता नष्ट करतो त्यामुळे कंडिशनरचा वापर फार महत्वाचा आहे. तसेच ड्राय केस नेहमी दुभांगलेले दिसतात. केसांत खूप खाज सुटते म्हणजे कोंड्याचे प्रमाण वाढते. केसांना नेहमी आद्रर्ता टिकवून ठेवणारे कंडीशनर वापरावे.

तेल – सध्या केसांसाठी तेलाचा वापर करणे फार कमी झाले आहे. मात्र तुम्हाला दाट, मुलायम केस हवे असतील तर तेलाची मालिश फार गरजेची आहे. आठवड्यातून कमीतकमी 3 वेळा रात्री झोपताना केसांच्या मुळांना व्यवस्थित तेल लावा. तेलामुळे केसांचा कोरडेपणा आणि कोंडा कमी होतो, रक्ताभिसरण वाढते आणि त्यामुळे केसांची वाढही व्यवस्थित होते.

सीरम – बाहेर जाताना केसांना तेल लावले तर, चेहराही तेलकट होतो त्यामुळे सध्या सीरमला प्राधान्य दिले जात आहे. सीरम तुमच्या केसांना स्मूथ बनवते. तसेच कोरडेपणा नाहीसा होऊन केसांना चमक प्राप्त होते, त्यामुळे बाहेर जाताना सीरमचा वापर गरजेचा आहे. सीरम सूर्यप्रकाशापासूनही केसांचे रक्षण करते.

जेल किंवा वॅक्स – आजकाल जेल किंवा वॅक्सशिवाय तुमची हेअरस्टाईल पूर्ण होऊच शकत नाही. आपल्याला नेमका कसा हेअरकट हवा आहे हे ओळखून त्याप्रमाणे जेल किंवा वॅक्स लावा. वॅक्स लावताना अगदी थोडे तळहातावर घेऊन ते पूर्णतः कोरडे करा त्यानंतर संपूर्ण केसांवर ते चोळा आणि नंतर ब्रशने हेअरस्टाईल करा.

केस धुण्यासाठी कायम थंड पाणी वापर. अगदी थंडीच्या मोसमात देखील गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाण्याने केस दुबळे, शुष्क, आणि रखरखीत होतात ज्याचे परिणाम म्हणून केस गळायला सुरवात होते. तर केसांची काळजी घेण्यासाठी असे रुटीन असू द्या. हेअरस्टाईल करताना कोरड्या केसांवर  वॅक्स लावा. त्यानंतर ब्रश आणि ड्रायरच्या सहाय्याने केस व्यवस्थित सेट करा.

(हेही वाचा: Men’s Lifestyle : चेहऱ्याचा उजळपणा टिकवून ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय)

कोंडा दूर करण्यासाठी काही उपाय –

> कोरफड – कोरफड ही केसांसाठी आणि त्वचेसाठी वरदान आहे. कोरफडीच्या गरात 4-5 थेंब लिंबू टाकून आंघोळीच्या आधी थोडावेळ केसांना लावून ठेवा. कोरफडीने जवळजवळ केसांच्या सर्व समस्या दूर होतात.

> लिंबू आणि तेल – दोन्ही समान प्रमणात घेऊन रात्री केसांच्या मुळांना लावा. सकाळी शाम्पू आणि कंडीशनरने केस धुवा.

> दही – केसातील कोंडा दूर करण्यासाठी दही हादेखील चांगला उपाय आहे. केसांना सर्वत्र दही लावून 45 मिनिटे तसेच ठेवा, त्यांनतर केस धुवा लगेच फरक जाणवेल.

> 2 अंडी, 1 चमचा मध आणि 2 चमचे दही घ्या. आधी अंडे फेटून घ्या त्यानंतर त्यात मध आणि दही घाला. त्याची चांगली पेस्ट झाल्यावर ती केसांना लावून ठेवा. 30 मिनिटांनी केस साध्या पाण्याने धुवून टाका.

दाट आणि मुलायम केसांसाठी तुमचा आहारही तसाच असणे गरजेचे आहे. जंकफूडचे आकर्षण, धावपळीची जीवनशैली यामुळे जीवनसत्त्वे, मूलद्रव्ये व प्रथिनांची कमतरता निर्माण होते आणि केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने तक्रारींची सुरुवात होते. त्यासाठी आहारामध्ये शेंगावर्गीय भाज्या, फळे, दूध, दही, ताक, हिरव्या पालेभाज्या, मोडाची धान्ये, मका इत्यादी अधिक प्रमाणात घ्यावे. यातून केसांना आवश्यक असलेली जीवनसत्त्वे (बी-3, बी-5, बी-9, बी-12, क व ई जीवनसत्त्व), लोह, प्रथिने व कॅल्शियम पुरेशा प्रमाणात मिळू शकतात.