Marathi Bhasha Din 2019: मराठी आहात? मग तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!
, तुम्ही जर ही वैशिष्ट्ये काळजीपूर्वक वाचल तर, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. इतकेच नव्हे तर मराठी असूनही आपल्याला या गोष्टी कशा माहित नाहीत याबाबत काहीसे वाईटही वाटेल.
Marathi Language Day: आपण‘जागतिक मराठी भाषा दिन’ ( Marathi Bhasha Din) साजरा करतो खरे. पण, आपल्यापैकी किती लोकांना मराठी भाषेच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती असते. केवळ 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेत प्रतिभासंपन्न साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यीकांपैकी एक म्हणजे विष्णू वामन शिरावाडकर (V.V. Shirwadkar) उर्फ ‘कुसुमाग्रज' यांचा हा जन्मदिवस. कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो इतकीच जुजबी माहिती अनेक मंडळी देत असतात. सोशल मीडियातूनही मराठी भाषेबद्दल मर्यादित माहिती एकमेकांना दिली जाते. पण, आपण जर खरोखरच मराठी भाषेबद्दल आत्मियता बाळगणारे असू तर, आपल्याला मराठी भाषेबाबत ही वैशिष्ट्ये माहिती असायलाच हवीत. , तुम्ही जर ही वैशिष्ट्ये काळजीपूर्वक वाचल तर, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. इतकेच नव्हे तर मराठी असूनही आपल्याला या गोष्टी कशा माहित नाहीत याबाबत काहीसे वाईटही वाटेल.
- लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक बोलली जाणारी मराठी ही भारतातील चौथी आणि जगातील चौदाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी भाषा दिन हा जगभर साजरा केला जातो.
- काही अभ्यासक सांगतात की, मराठी आणि इतर भारतीय भाषांवर संस्कार होऊन संस्कृत भाषा तयार झाली. तर काही जाणकार सांगतात की, भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे.
- मराठी भाषा जगभरात बोलली जाते. त्यापैकी मॉरिशस आणि इस्त्रायलसोबतच अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम (यूके), ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या देशांमधील बहुतांश लोक मराठी भाषेत बोलतात. त्यांना मराठी भाषा अवगत आहे.
- मराठी भाषा ही इसवी सन नवव्या शतकाच्याही आगोदरपासून बोलली जाते, असा दावा भाषाअभ्यासक करतात. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, आजघडीला मराठी भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या सुमारे ९,००,००,००० च्या आसपास आहे.
- मराठी भाषा ही महाराष्ट्र तसेच गोवा या राज्याचीही राजभाषा आहे. भारतात गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड या राज्यांसोबतच दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशाशीत प्रदेशांमध्येही मराठी भाषा बोलली जाते.
वि. वा. शिरवाडक उर्फ कुसुमाग्रज
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रतिभासंपन्न लेखक आहेत. भारतीय साहित्यात मानाचा समजला जाणारा ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार मराठीतील ज्या काही निवडक साहित्यिकांना मिळाला त्यापैकी कुसुमाग्रज एक. केवळ मराठीतीतल एक लेखक किंवा ज्ञानपीठ विजेता लेखक म्हणून पाहता येत नाही. मराठी साहित्य संस्कृती आणि भारतीय भाषीक लेखकांचे प्रतिनीधी म्हणूणही त्यांच्याकडे पाहावे लागते. 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस. मराठी साहित्यात सकस लेखण करुन त्यात मोलाची भर घालणारा लेखक अशी शिरवाडकरांची खास ओळख. अशा या लोकप्रिय लेखकाचा जन्मदिवसही तितकाच मोठा साजरा केला जावा अशी काही साहित्यिक आणि इतर मंडळींची इच्छा होती. त्यामुळे सरकारने कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरवले आणि तसे जाहीरही केले. तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.