Maharashtra Din 2022 Rangoli Designs: महाराष्ट्र दिनासाठी सुंदर रांगोळी डिझाईन्स, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र दिनाचे स्वागत करण्यासाठी येथे काही रांगोळी डिझाईन्सचे व्हिडीओ आहेत ज्या तुम्ही महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काढू शकतात.

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तो दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र दिन 2022 रविवारी येणार आहे. हा दिवस महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचा आणि महाराष्ट्र दिन आनंदाने, उत्साहाने साजरा करण्याचा आहे. महाराष्ट्र दिनाच्या उत्सवाचा एक अविभाज्य भाग म्हणजे सुंदर रांगोळी काढणे आहे. आता, रांगोळी ही एक जुनी कला प्रकार आहे जी शुभ प्रसंगी काढली जाते. महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि सुंदर रांगोळी काढतात. काही लोक मोठ्या रांगोळ्या काढतात, तर काही जण साध्या फुलांच्या रांगोळ्या काढतात आणि काही लोक महाराष्ट्र दिनाच्या थीम रांगोळ्या काढतात. महाराष्ट्र दिन हा दिवस मराठी भाषिक लोकांच्या समृद्ध संस्कृतीचा आणि नवीन आशा आकांक्षांचा उत्सव आहे. महाराष्ट्रातील लोक स्वादिष्ट पारंपारिक पदार्थ बनवून विविध उपक्रम राबवून हा सण साजरा करतात. महाराष्ट्र दिनाचे स्वागत करण्यासाठी येथे काही रांगोळी डिझाईन्स आहेत ज्या तुम्ही महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काढू शकतात.[ हे देखील वाचा : Akshaya Tritiya 2022: केवळ सोनेच नाही तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘या' वस्तू घरात आणल्यास संपत्तीमध्ये होते वाढ, जाणून घ्या]

महाराष्ट्र दिन 2022 साठी सोपी रांगोळी डिझाइन

महाराष्ट्र दिन 2022 साठी सोपी रांगोळी डिझाइन..

महाराष्ट्र दिन 2022 साठी सोपी रांगोळी डिझाइन..

महाराष्ट्र दिन 2022 साठी सोपी रांगोळी डिझाइन..

महाराष्ट्र दिन 2022 साठी सोपी रांगोळी डिझाइन..

मुंबई पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. मराठी, कोकणी, कच्छी आणि गुजराती या भाषा बोलणारे लोक  1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत बॉम्बे राज्यांतर्गत एकत्र केले गेले, परंतु ज्या विभाजनांचा उदय होऊ लागला, त्यामुळे एक नवीन चळवळ उभी राहिली आणि गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली.