Lalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan Day 8: घरबसल्या लालबागचा राजा 2019 चं दर्शन आणि आरती याचं थेट प्रक्षेपण पहा येथे!

गणोशोत्सवात गणेश मूर्तीची स्थापना करुन १० दिवस पूजा केली जाते. आज गणेशोत्सवचा आठवा दिवस आहे. मुंबईत सध्या गणेश मंडळाला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. नवसाला पावणारा गणपती, अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. एखाद्या व्यक्तीला ताबोडतोब लालबागच्या राजाचे दर्शन मिळाले तर, भाग्यवानच समजले जाते. महत्वाचे म्हणजे, लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी किमान 8 ते 10 तास रांगेत उभा राहावे लागते. यावर्षी पावसाने जोर धरला आहे, तरीदेखील भाविक लालबागच्या राजाचे दर्शन केल्याशिवाय राहिले नाहीत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही तेवढाच उत्साह, आनंद आणि गर्दी पाहायला मिळत आहे.

Lalbaghcha Raja (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणोशोत्सवात गणेश मूर्तीची स्थापना करुन 10 दिवस पूजा केली जाते. आज गणेशोत्सवचा आठवा दिवस आहे. मुंबईत सध्या गणेश मंडळाला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. नवसाला पावणारा गणपती, अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. एखाद्या व्यक्तीला ताबडतोब लालबागच्या राजाचे दर्शन मिळाले तर, भाग्यवानच समजले जाते. महत्वाचे म्हणजे, लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी किमान 8 ते 10 तास रांगेत उभा राहावे लागते. यावर्षी पावसाने जोर धरला आहे, तरीदेखील भाविक लालबागच्या राजाचे दर्शन केल्याशिवाय राहिले नाहीत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही तेवढाच उत्साह, आनंद आणि गर्दी पाहायला मिळत आहे.

मात्र, काही असेही लोक आहेत की, त्यांना काही कारणांमुळे त्यांना लागबागच्या राजाचे दर्शन घेणे अशक्य झाले आहे. यामुळे अशा भाविकांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहेत. तुम्हीही त्यापैकी एक आहात तर, निराश होण्याचे काहीच गरज नाही. महत्वाचे म्हणजे, अशा लोकांना आता घरात बसून लागबागच्या राजाची काकड आरती आणि मुख दर्शन घेता येणार आहे.Lalbaugcha Raja 2019 Live Darshan Online: लालबागच्या राजाचं घरबसल्या मोफत दर्शन घेण्यासाठी युट्युब, फेसबूक, ट्वीटर सह Android आणि iOS Mobile App च्या या लिंकवर क्लिक करा आणि यंदाचा गणेशोत्सव अधिक मंगलमय करा

इथे घेऊ शकता लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन 

भारत स्वातंत्र होण्यअगोदर 1934 सालीपासून लालबागच्या राजाची स्थापना केली जाते. मात्र, 2000सालापासून या गणेश मंडळाला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली. काही वर्षी पूर्वी लालबागच्या राजाची मूर्ती कारखान्यात घडवून मंडळाकडे आणली जात असे. परंतु रस्त्यावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमत असल्यामुळे वाहतूक कोंडीसारखे प्रश्न निर्माण होतात. यामुळे गेल्या काही वर्षापासून लालबागच्या राजाची मूर्तीची मंडळाच्या जागेवरच घडवली जात आहे. लालबागच्या राजाचे लाईव्ह मुखदर्शन मंडळाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे. दिवसातून दोन वेळेस लालबागच्या राजाची आरती होते. दुपारी12.30 आणि रात्री 8.30 वाजता बाप्पाची आरती होते. 11 सप्टेंबर 2019 रात्री 12 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचे दर्शन रांगेमधून घेता येणार आहे.