IND vs SL 2nd ODI Live Score Update: टीम इंडियाला चौथा मोठा धक्का, विराट कोहली 14 धावा करुन बाद
दुसऱ्या सामन्यातून दोन्ही संघांना मालिकेतील पहिला विजय मिळवायचा आहे. आज जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर टीम इंडिया विजयाचे शतक ठोकेल.
IND vs SL 2nd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला (IND vs SL 2nd ODI) जात आहे. याआधी दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला होता. आता दुसऱ्या सामन्यातून दोन्ही संघांना मालिकेतील पहिला विजय मिळवायचा आहे. आज जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर टीम इंडिया विजयाचे शतक ठोकेल. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेवून 50 षटकात 240 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, दुसरीकडे श्रीलंकेकडून कामिंदू मेंडिसने सर्वाधिक 40 धावा केल्या. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 241 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चौथा मोठा धक्का लागला आहे. विराट कोहली 14 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 123/4
2ND ODI. WICKET! 19.4: Virat Kohli 14(19) lbw Jeffrey Vandersay, India 123/4 https://t.co/KTwPVvU9s9 #SLvIND #2ndODI
— BCCI (@BCCI) August 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2024 08:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

