Hug Day 2020: एक प्रेमळ मिठी वाढवू शकते नात्यामधील प्रेम, विश्वास आणि जवळीक; जाणून घ्या 'हग डे' चे महत्व व कसा साजरा करावा हा दिवस

यामध्ये 12 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन सप्ताहाचा सहावा दिवस, 'हग डे' (Hug Day) म्हणून साजरा केला जाईल

Hug Day 2020 (Photo Credits: Unsplash)

सध्या प्रेम करणाऱ्या लोकांचा सर्वात आवडता आठवडा, म्हणजेच 'व्हॅलेंटाईन वीक' (Valentine's Week 2020) चालू आहे. यामध्ये 12 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन सप्ताहाचा सहावा दिवस, 'हग डे' (Hug Day) म्हणून साजरा केला जाईल. बहुतेकदा, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भावना शब्दांत व्यक्त करण्यास असमर्थ असते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला मिठी मारते, प्रेमाचे आलिंगन देते. शब्दांशिवाय भावना व्यक्त करणारी ही पेमळ मिठी आपल्या मनातील विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्यास मदत करते.

एका मिठीमुळे फक्त आपले प्रेमच टिकून राहत नाही, तर दूर गेलेला माणूस परत येण्याची शक्यताही वाढू शकते. ही उबदार मिठी आपण आपल्या जोडीदारावर किती प्रेम करते ते व्यक्त करते. त्यामुळे यंदाच्या 'हग डे'ला काही बोलण्याऐवजी आपल्या जोडीदाराला एक मिठी मारा आणि बघा नात्यातील समस्या कशा चुटकीसरशी दूर होतील.

'हग डे' साजरा करण्यामागे एक मोठे कारण आहे. जर आपला दिवस खूप खराब गेला असेल किंवा आपल्यासोबत काही वाईट घडत असेल, तर जोडीदाराला फक्त एक मिठी मारा. या मिठीमुळे तुमच्या लक्षात येईल की 'ही' व्यक्त सोबत असेल तर आपण कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो. यामुळे आपल्या जोडीदाराशी असलेले आपले नातेही घट्ट होते. 'हग डे' जोडप्यांनी फक्त एकच दिवस नाही, दररोज साजरा केला पाहिजे. असे म्हणतात की, जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्टोसिन नावाचा पदार्थ स्त्रवतो. यामुळे, आपण ज्या कोणाला मिठी माराल त्याच्याशी आपले नाते मजबूत बनते.

भारतामध्ये जोडप्यांनी ओपनली एकमेकांशी जास्त फिजिकल होण्याची संस्कृती नाही. त्यामुळे अनेकदा समाजाच्या दबावामुळे जोडपी आपल्या इच्छा दाबून ठेवतात. मात्र लक्षात घ्या समोरची व्यक्ती ही तुमची जोडीदार आहे, त्याला तुमच्या स्पर्शाची गरज आहे. त्यामुळे शक्य असेल तेव्हा तुमच्या जोडीदाराला मिठी मारण्याची संधी गमावू नका.

दरम्यान, यंदाचा 'आलिंगन दिन' फक्त आपल्या जोडीदारासोबतच नाही आपल्या जवळच्या, महत्वाच्या व्यक्तींसोबतही साजरा करू शकता.

- या दिवशी आपले आई=वडील, भावंडे यांना एक मिठी मारून त्यांचे तुमच्या आयुष्यातील महत्व व्यक्त करा.

- खास मित्रांना मिठी मारून, त्यांना जाणीव करून द्या की ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत.

- आपले जुने शिक्षक, कलीग, तुम्हाला रोजच्या कामात मदत करणारे लोक किंवा ज्यांच्याकडून तुम्ही काही शिकत असता, अशा लोकांना मिठी मारून, तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते त्यांच्यामुळेच आहात, ही भावना व्यक्त करा. (हेही वाचा: Hug Day 2020 Gift Ideas: यावर्षीच्या 'हग डे'ला प्रेमळ आलिंगनासोबत जोडीदाराला द्या खास गिफ्ट; 'असा' साजरा करा प्रेमाचा आठवडा)

दरम्यान, व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, परंतु त्यापूर्वीचा संपूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. या आठवड्याची सुरुवात होते रोझ डेने त्यानंतर प्रपोज डे,  चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि अखेर व्हॅलेंटाईन डे, असा हा संपूर्ण वीक साजरा केला जातो.