How To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत ? 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका
अनेकदा घरात योग्य ती स्वच्छता करुनही या पाली सरार्स आपलंच घरंं असल्यासारख्या आपल्या भिंंतींंवर टेहाळत असतात. पण यावर उपाय काय?
पाल..बघायला गेलं तर एक हातभर मापाचा प्राणी पण या प्राण्याला घरात भिंंतीवर, बाथरुम मध्ये किचन मध्ये पाहिलं तरी किळस वाटते. एक वेगळीच शिसारी येतं म्हंंटल तर अगदी योग्य ठरेल. अनेकदा घरात योग्य ती स्वच्छता करुनही या पाली सरार्स आपलंच घरंं असल्यासारख्या आपल्या भिंंतींंवर टेहाळत असतात. पण यावर उपाय काय? तसंं या पाली घरातुन घालवण्यासाठी पेस्ट कंंट्रोल करण्याचा मार्ग बराच प्रभावी असतो पण ही एक महाग आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, शिवाय घरात लहान मुलं असली आणि त्यांनी चुकुन याला हात लावला आणि तोच हात तोंंडाला लावला तर त्या विषारी पेस्टिसाईडसचा नको तो परिणाम सुद्धा होऊ शकतो. अशा सगळ्या समस्या आणि त्या समस्यांंचं मुळ म्हणजे पाली हटवण्यासाठी आज आपण काही सोप्पे घरगुती उपाय पाहणार आहोत, आपल्या घरात उपलब्ध वस्तुंंचाच यात वापर होत असल्याने वेगळा खर्च करण्याची किंंवा यासाठी शोधाशोध करायची सुद्धा तुम्हाला मेहनत पडणार नाही..चला तर मग.
घरातुन पाल घालवण्यासाठी घरगुती उपाय
- कॉफी+ तंंबाखु पुड: कॉफी पावडर आणि तंबाखू पावडर मिसळून याच्या लहान गोळ्या तयार करून तिथे ठेवा जिथे पाली येतात. हे मिश्रण खाल्ल्यानंतर पाली मरतील किंवा पळून जातील. यासोबतच नेप्थॉलिन बॉल्स सुद्धा ठेवु शकता.
-मिरपुड स्प्रे: घरातील काळ्या मिरीच्या पावडर मध्ये पाणी मिसळुन एका साध्य स्प्रे बॉटल मध्ये भरा, हे पाणी घरात पालींंचा जिथुन प्रवेश होतो अशा ठिकाणी म्हणजेच, बाथरुम, सिंंक, दरवाज्याच्या खाचा, खिडकीचे ग्रिल इथे स्प्रे करुन ठेवा, याचा वास उग्र असल्याने पाली घरात प्रवेशच करणार नाहीत.
-कांंदा व लसुण: आपल्या घरी आपण आलंं लसुणची जशी पेस्ट करतो तशीच पेस्ट कांंदा टाकुन तयार करा. ही पेस्ट पाण्यात मिसळुन घरात भितींवर स्प्रे करा. याशिवाय आपण एक कांंदा अर्धा कापुन घरातील छोट्या बल्ब ला अडकवुन ठेवा त्याच्या वासानेही पाली पळुन जातात.
-मोरपंंख: बाजारात मोरपंंख अगदी सहज मिळतात, आणि पाली या मोरपंंखांंना घाबरतात त्यामुळे घरात कानाकोपर्यात मोरपंंख ठेवणे तुम्हाला फायद्याचे ठरु शकते, पालींंसोबतच घरातील डेकॉरला पण यामुळे एक वेगळा टच देता येईल.
-अंड्याची टरफल: मोरपंंख सापडत नसल्यास आपण अंड्याचे टरफल सुद्धा घरात कानाकोपर्यात ठेवु शकता. अंड्यातील बल्क काढुन मग हलकेसे धुवुन ठेवल्यास पाली पळुन जातात. घरात घोंगावणा-या माश्यांचा कसा कराल बंदोबस्त? जाणून घ्या 5 घरगुती उपाय
तुमच्याकडे सुद्धा असे काही हटके फंडे असतील तर आम्हाला खाली दिलेल्या कमेंंट बॉक्स मधुन नक्की कळवा..
(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. याचा परिणाम कितपत होईल याचा आम्ही दावा करत नाही)