Horoscope Today आजचे राशीभविष्य, रविवार 01 ऑक्टोबर 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, रविवार 01 ऑक्टोबर 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

Horoscope | File Image

Horoscope Today 1st October 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, रविवार 01 ऑक्टोबर 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आजचा दिवस अनुकूल असेल. व्यवसायाच्या ठिकाणी तसेच घरात तणाव जाणवेल, मात्र संध्याकाळ मजेत व्यतीत कराल. गोड बोलून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा, मात्र यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता. आज शक्यतो दूरचा प्रवास टाळा.

शुभ उपाय- सकाळी महादेवाच्या पिंडीला बेलपत्र वाहा.

शुभ दान- मंदिरात अन्न दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

वृषभ (Taurus Horoscope Today): आजचा दिवस मिश्र असेल. आज आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वादविवाद किंवा विनाकारण चर्चा टाळा. आज खिशावर ताण पडण्याची शक्यता. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- गरजूला अंथरून दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस शुभ आहे. अनेक कामे पूर्णत्वास जातील. आपल्या मधुर वाणीने इतरांचे मन जिंकू शकाल. कामाच्या ठिकाणी पाठीवर कौतुकाची थाप मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आज शक्यता बाहेरचे खाणे टाळा.

शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- निळा

कर्क (Cancer Horoscope Today): व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजची स्थिती अनुकूल राहील. धंद्यात वाढ दिसेल. मात्र आज कोणालाही पैसे उसने देणे टाळा. अपुरे व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पोटाच्या किंवा डोळ्याच्या समस्या उद्भवतील.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- कोणत्याही काचेच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

सिंह (Leo Horoscope Today): स्वभावातील स्वार्थीपणामुळे आज जवळच्या मित्रासोबतचे नाते बिघडू शकते. आजचा दिवस बाहेरच्या कामासाठी तितकासा अनुकूल नाही. आज शक्यता नवीन कार्ये अथवा प्रकल्प सुरु करणे टाळा. घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ उपाय- कुलस्वामिनीची उपासना करा.

शुभ दान- रस्त्यातील गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- करडा

कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीतील व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल तसेच नवीन संधी चालून येतील. प्रवास फायदेशीर ठरेल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.

शुभ उपाय- सकाळी उठून तुळशीची पूजा करा.

शुभ दान- गुळ दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- गुलाबी

तुळ (Libra Horoscope Today): दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. व्यापाऱ्यांनी सांभाळून व्यवसाय करावा. जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता.

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.

शुभ दान- वस्त्रदान करा

शुभ अंक- 7

शुभ रंग- पिवळा

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): वृश्चिक राशीतील व्यक्तींना आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. आज एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात होईल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. वाहन जपून चालवा. कोणत्याही कामात हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- गरुजाला एखादे भांडे दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- हिरवा

धनु (Sagittarius Horoscope Today): सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती आज फलदायी ठरेल. अनेक बाबतीत यश मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभाचे संकेत. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल.

शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.

शुभ दान- धान्य दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- जांभळा

मकर (Capricorn Horoscope Today): मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

शुभ उपाय- गायीला चारा द्या.

शुभ दान- गरजूंना कपडा दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- लाल

कुंभ (Aquarius Horoscope Today): जवळचे लोक गैरफायदा घेण्याची शक्यता त्यामुळे सावध रहा. आज मनातील अनेक प्रश्नांचे निराकरण होईल. नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणच्या लोकांची परख होईल. आज निर्माण झालेले भावनिक नाते भविष्यात उपयोगी पडेल. मित्रांच्या साथीने नवीन योजना आखाल.

शुभ उपाय- पांढरे वस्त्र परिधान करा

शुभ दान- पांढऱ्या रंगाची वस्तू अथवा वस्त्र दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- पांढरा

मीन (Pisces Horoscope Today): आजचा दिवस संमिश्र असेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळा. नोकरी किंवा व्यवसायामध्ये दिलासादायक गोष्टी घडतील. दूरचा प्रवास फायदेशीर ठरेल. आर्थिक विवंचना जाणवेल व यातून मार्ग काढण्यासाठी जोडीदाराची मदत घ्या. मुलांशी खटके उडण्याची शक्यता.

शुभ उपाय- सकाळी उठून कुलदैवताची पूजा करा.

शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- लाल

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement