Horoscope Today राशीभविष्य,सोमवार 4 मार्च 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, सोमवार 4 मार्च 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Horoscope Today राशीभविष्य,सोमवार 4 मार्च 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today

Horoscope Today 4th March 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य, सोमवार 4 मार्च 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): मेष राशीतील व्यक्तींना आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे.एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत हात आखडता घ्या. घरातील वातावरण ताणाचे राहील त्यामुळे जिभेवर ताबा ठेवा.

शुभ उपाय- देवाला लाल रंगाचे वस्र परिधान करा.

शुभ दान- गरीब व्यक्तीला मदत करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- हिरवा

वृषभ (Taurus Horoscope Today): आजचा दिवस उत्तम आहे. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- भुकेल्यांना जेवण द्या.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पांढरा

मिथुन (Gemini Horoscope Today): मिथुन राशीतील व्यक्तींना आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. नवीन कामाची सुरुवात करू शकाल. जोडीदाराशी मनातील बोला त्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल.

शुभ उपाय- शंकराची उपासना करा.

शुभ दान- मंदिरात आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

कर्क (Cancer Horoscope Today): आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- पांढरा

सिंह (Leo Horoscope Today): तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- बाहेर पडताना हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा.

शुभ दान- हिरव्या रंगाचे वस्र दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- हिरवा

कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीतील व्यक्तींकडे आज पैशांची भरभराट होईल.तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.

शुभ उपाय- कुलस्वामिनीची उपासना करा.

शुभ दान- मंदिर उभारणीच्या कामात मदत करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- जांभळा

तुळ (Libra Horoscope Today): तूळ राशीतील व्यक्तींना आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल.

शुभ उपाय- काळे तीळ आणि नारळ वाहत्या पाण्यात सोडा.

शुभ दान- रस्त्यातील गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- सोनेरी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. तुळ व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

शुभ उपाय- गणपतीची आराधना करा.

शुभ दान- गुळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पिवळा

धनु (Sagittarius Horoscope Today): धनु राशीतील व्यक्तींनी आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा. प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा. परिवारातील मंडळींची साथ लाभेल.

शुभ उपाय- काळे तीळ पाण्यात सोडा.

शुभ दान- गरुजाला एखादे भांडे दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- करडा

मकर (Capricorn Horoscope Today): मकर राशीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.. घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

शुभ उपाय- काळे तीळ पाण्यात सोडा.

शुभ दान- गाईला चारा घाला.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी

कुंभ (Aquarius Horoscope Today): कुंभ राशीतील व्यक्तींना आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा.

शुभ उपाय- जेवणानंतर काहीतरी गोड खा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

मीन (Pisces Horoscope Today): आजचा दिवस मीन राशीतील व्यक्तींसाठी उत्साही असेल. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- सकाळी लवकर उठून सूर्य देवतेची पूजा करा.

शुभ दान- गरजूंना अन्नदान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2024 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).