Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 1 मार्च 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, शुक्रवार 1 मार्च 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Horoscope Today

Horoscope Today 1st March 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य, शुक्रवार 1 मार्च 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आजचा दिवस संमिश्र असेल. त्यामुळे मोठ्या योजना आखू नका, गुंतवणूक टाळा. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. कामाच्या ठिकाणी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यानुसार काळजी घ्या.

शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे टाळा.

शुभ दान- गरजूला वस्त्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

वृषभ (Taurus Horoscope Today): सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. आजचा दिवस शुभ असेल. आर्थिक लाभाची शक्यता. गुंतवणुकीचा विचार करू शकाल, मात्र याचा सर्व बाजूंनी विचार करा.

शुभ उपाय- सकाळी तुळशीला नमस्कार करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.

शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- अंथरुण दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- निळा

कर्क (Cancer Horoscope Today): मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

शुभ उपाय- गणपतीची पूजा करा

शुभ दान- भिक्षुकाला दान करा

शुभ अंक- 9

शुभ रंग- पांढरा

सिंह (Leo Horoscope Today): घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

शुभ उपाय- देवाला दुधाने स्नान घाला

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा

शुभ अंक- 7

शुभ रंग- आकाशी

कन्या (Virgo Horoscope Today): घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. दुरचा प्रवास टाळा.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

तुळ (Libra Horoscope Today): ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल. आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. जोडीदाराची प्रकृती खालावू शकते. आज शक्यतो कुटुंबांसोबत वेळ घालवणे फायद्याचे ठरेल.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. नोकरीच्या ठिकाणी उत्तम संधी चालून येतील त्यांचा फायदा करून घ्या.

शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या

शुभ दान- काचेच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

धनु (Sagittarius Horoscope Today): कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.

शुभ उपाय- स्नान झाल्यावर देवाची पूजा करा

शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा

शुभ अंक-5

शुभ रंग- करडा

मकर (Capricorn Horoscope Today): आज सामाजिक आणि धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम दिवस आहे. भविष्यात त्याचे उत्तम फळ मिळू शकते. आई-वडिलांशी आदराने वागा. त्यांचा सल्ला फायदेशीर ठरू शकेल. अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास टाकू नका.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- गाईला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- जांभळा

कुंभ (Aquarius Horoscope Today): आज जुने काही गैरसमज दूर होतील. त्यानुळे मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. व्यवसायात अतिघाई संकटात नेई अशी स्थिती स्वत:वर ओढवून घेऊ नका. नोकरीच्या बाबतीत उत्तम दिवस असेल.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- गरजूला एखादे भांडे दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

मीन (Pisces Horoscope Today): आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल. नकारात्मक विचारांना दूर ठेवा, यामुळे उत्पादनक्षमतेवर नक्कीच परिणाम होईल.

शुभ उपाय- जेवणानंतर गोड खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- निळा