Benefits of Health Insurance at Early Age: वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत आरोग्य विमा न घेतल्यास तुम्हाला नंतर होऊ शकतो पश्चाताप; आरोग्य विमा लवकर का घ्यावा? जाणून घ्या कारणं

आज आम्ही तुम्हाला या सात कारणांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही वयाच्या 30 वर्षापूर्वी आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे.

Health Insurance (PC -Pixabay)

Benefits of Health Insurance at Early Age: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य विमा (Health Insurance) आवश्यक झाला आहे. त्यात महागड्या उपचारांमुळे झालेला खर्च भागवला जातो. तसेच, कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विमा तुमचे आर्थिक आरोग्य चांगले ठेवते. आर्थिक सल्लागार अनेकदा लोकांना सल्ला देतात की, तुम्ही लवकरात लवकर चांगली आरोग्य विमा योजना घ्या. आज आम्ही तुम्हाला या सात कारणांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही वयाच्या 30 वर्षापूर्वी आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. (हेही वाचा - 48 Drugs Fail Latest Quality Test: मधुमेह, रक्तदाब ते मल्टि व्हिटॅमिन्सची 48 औषधं गुणवत्ता मापदंड पार करण्यात ठरली अपयशी)

कमी प्रीमियम -

जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 5 लाखांचा आरोग्य विमा घेतला तर त्याचा प्रीमियम साधारणपणे 5000 रुपये येतो. 35 ला ते 6000 रुपये आणि 45 ला ते 8000 रुपयांपर्यंत पोहोचते. या कारणामुळे तुम्ही लवकरात लवकर आरोग्य विमा घेणं आवश्यक आहे. (हेही वाचा - Indian Diet, Tea-Turmeric Lowered Covid Severity: भारतीय आहार, चहा आणि हळदीच्या वापरामुळे कमी झाली कोविडची तीव्रता व मृत्यू- ICMR Study)

कंपनीने दिलेले आरोग्य विम्यामध्ये कमी कव्हर -

साधारणपणे, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना आरोग्य विमा मिळत नाही. कारण त्यांना कंपनीकडून समूह आरोग्य विमा दिला जातो. आजकाल उपचाराचा खर्च लक्षात घेता वैयक्तिक आरोग्य विमा घेणे आवश्यक झाले आहे.

जीवनशैली बदल -

आजच्या काळात जीवनशैलीत खूप बदल झाले आहेत. त्यामुळे वयाच्या 45 व्या वर्षी मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि इतर आजार तरुणांनाही सहज होऊ लागले आहेत. या कारणास्तव, आरोग्य विमा घेणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

आर्थिक सुरक्षा -

आजच्या काळात किरकोळ आजारासाठी दवाखान्यात जाण्यासाठी हजारो-लाखो रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे, जर तुम्हाला मोठा आजार झाला तर तुमची संपूर्ण बचत गमावू शकते.

कर बचत -

तुमच्या कर बचतीमध्ये आरोग्य विमा मोठी भूमिका बजावते. आयकराच्या कलम 80D अंतर्गत, तुम्हाला स्वत:साठी आणि पत्नी आणि मुलांसाठी भरलेल्या प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंत आणि पालकांसाठी भरलेल्या प्रीमियमवर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळते.

लवकरच विमा घेतल्याचे फायदे -

30 वर्षांपर्यंत सहसा कोणत्याही व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. यामुळे तुम्हाला खूप कमी प्रीमियममध्ये अधिक कव्हरेज मिळते.

ओपीडी आणि निदान चाचण्यांचा विम्यात समावेश -

आरोग्य विमा घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाव्यतिरिक्त, कंपन्या पॉलिसीधारकाला हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या आणि नंतरच्या खर्चासाठी जसे की ओपीडी आणि निदान चाचण्या इत्यादीसाठीही पैसे देतात.